सिंधुदुर्गात सोनुर्ली येथील माऊली देवीचा लोटांगणाचा जत्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 04:48 PM2017-10-16T16:48:17+5:302017-10-16T16:57:14+5:30

  दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सोनुर्ली येथील श्री देवी सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव यावर्षी ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सोनुर्ली माऊली देवीचा जत्रोत्सव लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे.

Lallangana Jatrootsav on 5th November, Mauli Devi of Sonurli in Sindhudurg district | सिंधुदुर्गात सोनुर्ली येथील माऊली देवीचा लोटांगणाचा जत्रोत्सव

सिंधुदुर्गात सोनुर्ली येथील माऊली देवीचा लोटांगणाचा जत्रोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्देलोटांगण यात्रेसाठी सोनुर्लीवासीय सज्ज लोटांगण घालून केली जाते नवसफेड ५ नोव्हेंबरला रात्री उशिरापर्यंत सोहळा सुरू

तळवडे , दि. १६ :   दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सोनुर्ली येथील श्री देवी सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव यावर्षी ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सोनुर्ली माऊली देवीचा जत्रोत्सव लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे.


श्री देवी माऊली देवस्थान हे जिल्ह्यासह राज्यात जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. देवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी राज्यभरातून लाखो भाविक उपस्थित राहून देवी माऊलीचे दर्शन घेतात. मुंबई, गोवा, कोल्हापूर, रत्नागरी आदी भागातून हजारो भाविक या यात्रेसाठी येतात.


दरम्यान, जत्रोत्सवासाठी माऊली मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ज्या काही मोठ्या जत्रा आहेत त्यांची सुरुवात सोनुर्लीच्या जत्रेपासून होते. अशा या प्रसिद्ध सोनुर्ली यात्रेसाठी सोनुर्लीवासीय सज्ज झाले आहेत.


लोटांगणाचा जत्रोत्सव

सोनुर्ली माऊली देवीचा जत्रोत्सव लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. देवीला भाविक लोटांगणाचा नवस बोलतात. नवस पूर्ण होऊन मनोकामना पूर्ण झाल्यानंतर लोटांगण घालून नवसफेड केली जाते. रात्री उशिरापर्यंत हा सोहळा सुरू असतो.
 

Web Title: Lallangana Jatrootsav on 5th November, Mauli Devi of Sonurli in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :konkanकोकण