चौपदरीकरण कामाच्या दुसऱ्या टप्प्यात भूसंपादनाची थ्रीडी अधिसूचना जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 04:29 PM2020-03-17T16:29:02+5:302020-03-17T16:30:20+5:30
चौपदरीकरण कामाच्या दुसऱ्या टप्प्यात संपादित करायच्या जमिनीसाठीची थ्रीडी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या दोन थ्रीडी असून एकामध्ये कणकवली, ओसरगाव व वागदे तर दुसऱ्यामध्ये असलदे, हुंबरट, जांभळगाव, जानवली, खारेपाटण, नडगिवे, नागसावंतवाडी, नांदगाव, साळीस्ते, संभाजीनगर, तळेरे, उत्तर - दक्षिण गावठाण, वारगाव या गावांचा समावेश आहे.
कणकवली : चौपदरीकरण कामाच्या दुसऱ्या टप्प्यात संपादित करायच्या जमिनीसाठीची थ्रीडी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या दोन थ्रीडी असून एकामध्ये कणकवली, ओसरगाव व वागदे तर दुसऱ्यामध्ये असलदे, हुंबरट, जांभळगाव, जानवली, खारेपाटण, नडगिवे, नागसावंतवाडी, नांदगाव, साळीस्ते, संभाजीनगर, तळेरे, उत्तर - दक्षिण गावठाण, वारगाव या गावांचा समावेश आहे.
दरम्यान, थ्रीडीनंतर संयुक्त मोजणी व मूल्यांकन करून निवाडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली.
पहिल्या टप्प्यातील भूसंपादन प्रक्रिया झाल्यानंतर काही ठिकाणच्या जमिनींची संपादन प्रक्रिया शिल्लक राहिल्याचे दिसून आले होते. यासाठी नव्याने संपादन प्रक्रिया करण्याच्या अनुषंगाने निवाडे तयार करण्यात आले होते.
या जमिनींसाठी थ्रीए जाहीर झाल्यानंतर आता थ्रीडी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
या अधिसूचनेत कणकवलीसह ओसरगाव व वागदे या गावांचा समावेश आहे. त्यात टोलनाक्यासह शिल्लक जमिनींचा समावेश करण्यात आला आहे. या तीन गावांमधील मिळून १५९१५ हेक्टर एवढ्या जमिनीचा समावेश आहे.
दुसऱ्या थ्रीडीमध्ये असलदे, हुंबरट, जांभळगाव, जानवली, खारेपाटण, नडगिवे, नागसावंतवाडी, नांदगाव, साळीस्ते, संभाजीनगर, तळेरे , उत्तर-दक्षिण गावठाण, वारगाव या तेरा गावांमधील २.१६५ हेक्टर जमिनीचा समावेश आहे.
शिल्लक जमिनीच्या संपादनासाठीची थ्रीडी जाहीर झाल्यानंतर संयुक्त मोजणी होऊन मूल्यांकन होणार आहे. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.