फोंडाघाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प; सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 9, 2023 01:38 PM2023-09-09T13:38:00+5:302023-09-09T13:38:38+5:30
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या बारा तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सकाळच्या सत्रात फोंडाघाट येथील दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प ...
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या बारा तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सकाळच्या सत्रात फोंडाघाट येथील दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
फोंडा घाटातील रस्ता वाहतुकीस योग्य असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक याच घाटातून होत होती. मात्र काल रात्रीपासून पडत असलेल्या संततधर पावसामुळे घाटातील दरडीचा काही भाग रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक टप्प झाली आहे.
दरम्यान जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्री पासूनच पावसाची संततधार सुरू आहे. मागील पंधरा दिवस पाऊस गायब झाल्याने भातशेती करपून गेली होती. मात्र आता पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी दरड हटविण्याच्या कामाला बांधकाम विभागाकडून सुरूवात झाली आहे. सतत पाऊस पडत असल्याने काम करताना अडथळा निर्माण होत आहे.