आंबोली घाटात दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच; पुन्हा मोठा दगड रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 10:17 AM2024-07-17T10:17:18+5:302024-07-17T10:17:27+5:30
आंबोली घाटातून एकेरी वाहतूक सुरू
सावंतवाडी : आंबोली घाटात दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच असून येथील मुख्य दरड कोसळलेल्या ठिकाणी पुन्हा एकदा भला मोठा दगड कोसळला आहे. यात सुदैवाने कोणतीही नुकसानी झाली नाही. परंतु दगड मोठा असल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तर एसटी वाहतूक बस स्थानक परिसरात रोखण्यात आली आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला.
मुसळधार पावसामुळे घाटात दरड कोसळत आहे.घाट रस्ता धोकादायक बनला आहे. त्यामुळे प्रवासी आणि पर्यटकात भीतीचे वातावरण आहे.
आंबोली घाटात २ आठवड्यापूर्वी असाच भला मोठा दगड खाली आला होता.त्यामुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला होता. मात्र तो दगड जेसीबीच्या साह्याने बाजूला करण्यात आला होता. आज पुन्हा असाच दगड मुख्य दरडीच्या ठिकाणी खाली आला आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे.
घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. घटनास्थळी आंबोली पोलीस दाखल झाले आहेत. अद्याप पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही यंत्रणा त्याठिकाणी आली नसल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र जेसीबीच्या साह्याने तो दगड बाजूला करावा लागणार आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.