सिंधुदुर्ग: चिंदर-तेरई डोंगरामध्ये भूस्खलन, घरांना धोका वाढला; प्रशासन सुस्तच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 04:47 PM2022-08-12T16:47:12+5:302022-08-12T16:47:42+5:30

गेल्या वर्षीची भूस्खलन घटना ताजी असताना पुन्हा यावर्षीही भूस्खलन झाले असून मागील वर्षी घटना घडूनही प्रशासन स्थानिक आमदार यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही.

Landslides in Chinder-Terai hills, threat to houses increased | सिंधुदुर्ग: चिंदर-तेरई डोंगरामध्ये भूस्खलन, घरांना धोका वाढला; प्रशासन सुस्तच

सिंधुदुर्ग: चिंदर-तेरई डोंगरामध्ये भूस्खलन, घरांना धोका वाढला; प्रशासन सुस्तच

Next

आचरा : सतत कोसळणाऱ्या पावसाचा फटका चिंदर तेरईला बसला आहे. तेथील डोंगर खचू लागला असून उत्तम घागरे यांच्या घरामागील बाजूच्या पडवीवर मोठया प्रमाणत भूस्खलन होऊन दगड मातीचे ढीग येऊन धडकले आहेत. घराच्या काही भिंतीना तडे जाऊन जमिनीला तडे गेले आहेत.

या घरातील कुटुंबिय मुंबईला गेले असल्याने घर बंद अवस्थेत आहे. समोरील मांगराच्या सर्व चिरेबंदी भिंतींसह जमिनीला भेगा पडल्या असून मांगर कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटने नंतर महसूल प्रशासनाने घागरे यांच्या बंद घरावर धोकादायक परिस्तिथीमुळे स्थलांतरीत होण्याची नोटीस चिकटवली आहे.

चिंदर तेरई येथील उत्तम घागरे यांच्या घरालगतचा डोंगर खचण्याची घटना मागील वर्षी जुलै महिन्यात घडली  होती त्यावेळी त्यावेळीही घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते याचबरोबर घरा बाजूने जाणाऱ्या रस्त्याचीही ऊंची वाढण्याची घटना घडली होती. घागरे कुटूंबिय कामानिमित्त मुंबईला गेले असून त्याचे घर बंद आहे. बुधवारी संध्याकाळी त्यांच्या घरामागील डोंगराचा भाग कोसळून घरावर सरकत असल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले.  

घरामागील बाजूच्या पडवीवर मोठया प्रमाणत भूस्खलन होऊन दगड मातीचे ढीग येऊन धडकले होते. घराच्या काही भिंतीना तडे जाऊन जमिनीला तडे गेले आहेत.  समोरील मांगराच्या सर्व चिरेबंदी भिंतींसह जमिनीला भेगा पडल्या असून मांगर कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.  सदर घटनेची माहिती ग्रामपंचायला देत याबाबतची माहिती महसूल प्रशासनास दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच चिंदर सरपंच राजश्री कोदे, उपसरपंच दीपक सुर्वे, सदस्य शशिकांत नाटेकर तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गावकर, ग्रामस्थ रवी घागरे सुभाष सावंत किशोर खोत, पोलीस पाटील दिनेश पाताडे दाखल झाले होते.

कोणतीही दखल न घेतल्याने ही पुनरावृत्ती

गेल्या वर्षीची भूस्खलन घटना  ताजी असताना पुन्हा यावर्षीही भूस्खलन झाले असून मागील वर्षी घटना घडूनही प्रशासन स्थानिक आमदार यांनी कोणतीही उचल घेतलेली नाही. मागील वर्षी  आमदार तसेच महसूल प्रशासन कडून पाहणी करण्यापलीकडे कोणतेही काम झालेले नाही.

गेल्या वर्षी घटना  घडल्यानंतर प्रशासनाला सक्तीच्या सूचना देऊन तात्काळ महसूल प्रशासन कडून उपाय योजना अथवा यावर पर्याय काढणे गरजेचे होते मात्र यावर्षीचा पावसाळा अर्ध्यावर आला तरी यावर कोणतीही दखल न घेतल्याने पुन्हा ही पुनरावृत्ती झाली आहे. महसूल प्रशासन फक्त नोटीसा बजावत आपली जबाबदारी झटकत असल्याचे सांगत चिंदर सरपंच राजश्री कोदे यांनी पाहणी दरम्यान संताप व्यक्त केला आहे.

Web Title: Landslides in Chinder-Terai hills, threat to houses increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.