सिंधुदुर्गातील पहिल्या वॉटर एटीएम मशीनचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 02:20 PM2020-10-08T14:20:29+5:302020-10-08T14:22:01+5:30

water scarcity, vengurla, tourist, sindhudurgnews वेंगुर्ल्यात येणारे पर्यटक, शहरातील नागरिकांना तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विनासायास उपलब्ध व्हावे यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने नावीन्यपूर्ण योजनेतून ३० लाख रुपये खर्च करून शहरात पाच ठिकाणी वॉटर एटीएम मशीन बसविल्या आहेत.

Launch of the first water ATM machine in Sindhudurg | सिंधुदुर्गातील पहिल्या वॉटर एटीएम मशीनचा शुभारंभ

वेंगुर्ला बंदर येथे बसविण्यात आलेल्या वॉटर एटीएम मशीनचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, इतर नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देसिंधुदुर्गातील पहिल्या वॉटर एटीएम मशीनचा शुभारंभ३० लाख रुपये खर्च, शहरात पाच ठिकाणी वॉटर एटीएम मशीन

वेंगुर्ला : वेंगुर्ल्यात येणारे पर्यटक, शहरातील नागरिकांना तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विनासायास उपलब्ध व्हावे यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने नावीन्यपूर्ण योजनेतून ३० लाख रुपये खर्च करून शहरात पाच ठिकाणी वॉटर एटीएम मशीन बसविल्या आहेत.

वॉटर एटीएम सुविधा उपलब्ध करून देणारी वेंगुर्ला नगरपरिषद ही सिंधुदुर्गातील पहिलीच नगरपरिषद आहे. या वॉटर एटीएम सुविधेचा शुभारंभ मंगळवारी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते करण्यात आला.

वेंगुर्ला शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना, शहरातील नागरिकांना तसेच विशेषत: पर्यटकांना स्वच्छ पिण्याचे पाणी विनासायास व अल्प किमतीत उपलब्ध व्हावे यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने कौन्सिल सभेत वेंगुर्ला बंदर, दाभोली नाका, रामेश्वर मंदिर, हॉस्पिटल नाका व नगरपरिषद इमारत अशा पाच ठिकाणी वॉटर एटीएम मशीन सुविधा उभारण्यासंदर्भात ठराव केला व तो प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला होता.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेतून ३० लाख रुपये निधी मंजूर केला होता. या ३० लाख रुपये निधीतून शहरात पाच ठिकाणी या वॉटर एटीएम मशीन बसविण्यात आल्या आहेत.

यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, विधाता सावंत, प्रशांत आपटे, प्रकाश डिचोलकर, धर्मराज कांबळी, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, अधीक्षक संगीता कुबल, पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

विकासकामांसाठी संघटितपणे प्रयत्न

आज बाजारात वीस रुपये लीटर पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचा दर आहे. मात्र, वेंगुर्ला नगरपरिषदेने साधे पाणी एक रुपया लीटर व थंड पाणी एक रुपया अर्धा लिटर असे माफक दर ठेवले आहेत. या मशीनचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते करण्यात आले.

या वॉटर एटीएम मशीनसाठी दीपक केसरकर यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगराध्यक्ष गिरप यांनी केसरकर यांचे आभार व्यक्त केले. वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये सर्वच पक्षांचे नगरसेवक एक असून विकास कामांसाठी संघटितपणे प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.


 

Web Title: Launch of the first water ATM machine in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.