मोसमी पावसाच्या आगमनाने मच्छिमारी हंगाम बंद, खाडीकिनारी पारंपरिक मासेमारीस प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 03:26 PM2018-06-07T15:26:30+5:302018-06-07T15:26:30+5:30

पावसाळा सुरू झाल्याने बोटीवरील मच्छिमारी हंगाम आता बंद झाला आहे.

Launch of seasonal rains, fisheries off season, start the traditional fishing fishing on the creek | मोसमी पावसाच्या आगमनाने मच्छिमारी हंगाम बंद, खाडीकिनारी पारंपरिक मासेमारीस प्रारंभ

मोसमी पावसाच्या आगमनाने मच्छिमारी हंगाम बंद, खाडीकिनारी पारंपरिक मासेमारीस प्रारंभ

Next

देवगड : पावसाळा सुरू झाल्याने बोटीवरील मच्छिमारी हंगाम आता बंद झाला आहे. यामुळे आता तालुक्यातील खाडीकिनाºयालगत असणाऱ्या मच्छिमार बांधवांनी पारंपरिक पध्दतीने मासेमारी करण्यास सुरुवात केली आहे.
यावर्षी १ जूनपासून बोटीवरील मासेमारी बंद झाली आहे. नारळी पौर्णिमेपर्यंत खोल पाण्यातील मासेमारी करण्यास शासनाची बंदी असते. दरम्यानच्या कालावधीमध्ये मच्छिमार बांधव पारंपरिक पध्दतीने खाडीमध्ये व समुद्रकिनारी भागात जाळ्याने मासेमारी करीत असतात. ही मासेमारी सध्या पारंपरिक पध्दतीने केली जाणारी मासेमारी आहे. देवगड बंदरावर खोल पाण्याच्या मासेमारीच्या काळात मोठ्या लिलाव पध्दतीने मासळीची विक्री केली जाते. यामुळे ही मासळी गावोगावी छोटेमोठे मच्छिमार व्यावसायिक घेऊन जाऊन तिची विक्री करीत असतात. यामुळे गावागावांमध्येही मच्छी उपलब्ध होत असते. 
देवगड व विजयदुर्ग बंदरांमध्ये लिलाव पध्दतीने मच्छीची विक्री केली जाते. सध्या खोल पाण्यातील मासेमारी शासनाने पावसाळ्याच्या कालावधीमध्ये बंद केल्याने विजयदुर्गपासून हिंदळे, मोर्वेपर्यंत खाडीकिनारी भागातील मच्छिमार बांधवांनी पारंपरिक पध्दतीने मासेमारी करण्यास सुरुवात केली आहे. काही मच्छिमार जाळ्याने समुद्रात व खाडीमध्ये मासेमारी करतात तर काही ठिकाणी गरी टाकून मासेमारी केली जाते. विजयदुर्ग, रामेश्वर, गिर्ये, हुर्शी, कलंबई, फणसे, पडवणे, वाडातर, मोंड, तिर्लोट, वीरवाडी, कुणकेश्वर, देवगड, मिठमुंबरी, कातवण, हिंदळे, मुणगे, मोर्वे, मिठबांव, वाघोटण, मालपे आदी गावामधील समुद्र किनाºयांवर खाडी असल्याने पारंपरिक पध्दतीने मासेमारी करण्यास सुरुवात केली आहे.
मच्छिमारी बंद आहे. त्यामुळे मच्छी खवय्यांना मच्छी मिळत नाही. तरीही मुळे व तिसरेदेखील पावसाळ्यात जास्त प्रमाणात मिळत असतात. यामुळे हॉटेल्समध्ये सुळे मच्छी व तिसरे, मुळे यासारखे पदार्थ हमखास उपलब्ध असतात. 

मच्छिमारी बंद
खोल पाण्यातील मच्छिमारी बंद झाल्याने पावसाळ्यामध्ये मासेमारीचा दुष्काळ समजला जातो. यामुळे मच्छीचे भावदेखील गगनाला भिडलेले असतात. पावसाळ्यामध्ये सुळा मच्छी जास्त प्रमाणात खाडीमध्ये मिळते. यामुळे सुरमई, पापलेट खाणाºयांना सुळा मच्छीकडे वळावे लागते. ही मच्छी पावसाळयात जरी जास्त प्रमाणात मिळत असली तरी इतर मच्छी कमी मिळत असल्याने या सुळा मच्छीचा भावदेखील वाढलेला असतो.
 

Web Title: Launch of seasonal rains, fisheries off season, start the traditional fishing fishing on the creek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस