पाडलोस आंब्याचेगाळू येथे बिबट्याच्या पाऊलखुणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 03:46 PM2021-02-15T15:46:31+5:302021-02-15T15:47:56+5:30

leopard Sindudurg- पाडलोसमध्ये वारंवार रानटी प्राण्यांचा उपद्रव सुरूच असल्यामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे. केणीवाडा येथे गुरांच्या पाण्यासाठी असलेल्या बंधाऱ्यावर रविवारी सकाळी बिबट्याच्या पावलांच्या खुणा शेतकऱ्यांना दिसून आल्या. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने योग्य त्या उपाययोजना करून आमच्या पाळीव जनावरांचा रानटी प्राण्यांच्या हल्ल्यातून बचाव करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Leopard footprints at Padlos Mango | पाडलोस आंब्याचेगाळू येथे बिबट्याच्या पाऊलखुणा

पाडलोस केणीवाडा आंब्याचेगाळू येथे वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा शेतकऱ्यांना दिसून आल्या. (छाया : अजित दळवी)

Next
ठळक मुद्देपाडलोस आंब्याचेगाळू येथे बिबट्याच्या पाऊलखुणास्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण : उपाययोजना करण्याची मागणी

बांदा : पाडलोसमध्ये वारंवार रानटी प्राण्यांचा उपद्रव सुरूच असल्यामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे. केणीवाडा येथे गुरांच्या पाण्यासाठी असलेल्या बंधाऱ्यावर रविवारी सकाळी बिबट्याच्या पावलांच्या खुणा शेतकऱ्यांना दिसून आल्या. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने योग्य त्या उपाययोजना करून आमच्या पाळीव जनावरांचा रानटी प्राण्यांच्या हल्ल्यातून बचाव करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

केणीवाडा येथील शेतकरी अमित नाईक यांना गेल्यावर्षी आंब्याचेगाळू याच ठिकाणी बिबट्याच्या पावलांच्या खुणा दिसल्या होत्या. ही माहिती वनविभागाला दिल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच त्या खुणा बिबट्याच्या पावलांच्या असल्याचे सांगितले होते. बिबट्या पाणी पिण्याच्या उद्देशाने वस्तीनजीक येत असून, तो पाळीव प्राण्यांवर सहसा हल्ला करणार नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले होते. यावर्षी पुन्हा त्या परिसरात पावलांच्या खुणा आढळून आल्याने शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. तसेच त्या खुणा बिबट्याचा असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.

पाणतळी निर्माण करावी

पाणी पिण्यासाठी रानटी प्राणी वस्तीत घुसत असून, वनविभागाने जंगलानजीकच पाणतळी निर्माण करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून वारंवार होत आहे.
परंतु सर्व काही कागदोपत्रीच होत असल्याने प्रत्यक्षात रानटी प्राणी मात्र भरवस्तीत घुसत असल्याचे प्रकार समोर येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत वनविभागाने छोटे छोटे बंधारे घालून वन्यप्राण्यांना जंगलातच थांबवावे, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे

 

Web Title: Leopard footprints at Padlos Mango

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.