बिबट्याच्या कातड्याची विक्री करणारे आठ जण ताब्यात, १९ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 12:47 PM2018-08-14T12:47:48+5:302018-08-14T12:52:15+5:30
बिबट्याच्या कातड्याची विक्री करण्यासाठी आलेले आठ जण स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.
सिंधुदुर्ग : बिबट्याच्या कातड्याची विक्री करण्यासाठी आलेले आठ जण स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती.
पांढऱ्या रंगाच्या टाटा सुमोमध्ये अमेरिकन टूरिस्ट बॅग होती. या बॅगमध्ये बिबट्या व वन्यप्राणी जातीचे कातडे असल्याचे समोर आले. या आठही आरोपींना ताब्यात घेऊन दोन बिबट्यांचे कातडे वाहन व इतर साहित्य मिळून सुमारे १९ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास कणकवली पोलीस ठाणे करत असून जिल्ह्यात वाघाच्या कातडीच्या तस्करीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.