Sindhudurg: कोंडये परिसरात बिबट्याचे दर्शन, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
By सुधीर राणे | Updated: December 5, 2023 12:54 IST2023-12-05T12:54:22+5:302023-12-05T12:54:47+5:30
कणकवली: तालुक्यातील कोंडये येथे ग्रामस्थांना एका काजू बागेजवळ बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेबाबत ...

Sindhudurg: कोंडये परिसरात बिबट्याचे दर्शन, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
कणकवली: तालुक्यातील कोंडये येथे ग्रामस्थांना एका काजू बागेजवळ बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेबाबत वनविभागाला कळविण्यात आले असून त्यांनी बिबट्याचा बंदोबस्त तातडीने करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
कोंडये येथील काजूबागेत काम करणाऱ्या एका व्यक्तीला सोमवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्या दिसून आला. त्याने इतर ग्रामस्थांना त्याबाबत सांगितले. त्यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. तसेच वनरक्षक अतुल पाटील यांना कळविण्यात आले. त्यांनी अलीकडेच घोणसरी येथे पकडलेल्या बिबट्या मादीचे बछडे फोंडाघाट परिसरातील जंगलात फिरत असून पाण्याच्या शोधात ते खाली आले असतील असे सांगितले. तसेच ग्रामस्थानी घाबरू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.