‘मुद्रा’ची समृद्धी घराघरात आणूया

By Admin | Published: October 25, 2015 11:21 PM2015-10-25T23:21:47+5:302015-10-25T23:32:32+5:30

सुरेश प्रभू : योजनेचा उद्देश सफल करावा; रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या बँकांची आढावा बैठक

Let's bring prosperity of 'money' to our house | ‘मुद्रा’ची समृद्धी घराघरात आणूया

‘मुद्रा’ची समृद्धी घराघरात आणूया

googlenewsNext

मालवण : उद्योजक वाढीसाठी पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांनी जाहीर केलेल्या मुद्रा योजनेचे उद्दिष्ट साध्य करणे एवढेच काम बँकांनी न करता या योजनेचा हेतू सफल व्हावा. मुद्रा योजनेच्या माध्यमातून उद्योजक निर्माण झाल्यास घरोघरी समृद्धी पोहचेल आणि खऱ्या अर्थाने या योजनेचा हेतू सफल होईल. कोकणातील माणूस प्रामाणिक आहे. तो वेळेत कर्जफेड करेल.
रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या मुद्र्रा बँक योजनेच्या माध्यमातून देशात आदर्श मॉडेल निर्माण करूया, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. मालवण शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा दौऱ्यावर असलेल्या रेल्वेमंत्री प्रभू यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथील राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक तथा वरिष्ठ अधिकारी यांची पंतप्रधान मुद्रा बँक योजनेच्या आढाव्याबाबत बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, तहसीलदार वनिता पाटील तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते. रभू म्हणाले, मुद्रा योजनेबाबत काही बँकांनी आपली उद्दिष्टे पूर्ण झाली असल्याचे सांगितले. यावर  प्रभूयांनी नुसती उद्दिष्टे साध्य करून चालणार नाही. तर योजनेचा हेतू सफल झाला पाहिजे. बेरोजगार युवक व व्यवसाय करणाऱ्यांना रोजगार मिळून घराघरात समृद्धी पोहचली पाहिजे. कोकणातील माणूस फसवणूक करणार नाही. (प्रतिनिधी)


आधुनिकतेची कास धरावी
मच्छिमार, आंबा, काजू, माड, बागायतदार, शेतकरी यांना प्रशिक्षण देऊन नव्या आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून घराघरात विकास करूया. बचतगट, सामाजिक संस्था यांच्याही समृद्धीसाठी बँकांनी प्रयत्न करावे. गावागावात ग्रामसभेत या योजनेची माहिती द्या. योजनेचा प्रत्येक महिन्याला आढावा घेण्याबाबतही सक्त सूचना करण्यात आल्या.

Web Title: Let's bring prosperity of 'money' to our house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.