अर्धवट क्रीडांगणे सुसज्ज करू

By admin | Published: August 30, 2015 11:48 PM2015-08-30T23:48:49+5:302015-08-30T23:48:49+5:30

दीपक केसरकर : सिंधुदुर्गनगरीतील कार्यक्रमात मार्गदर्शन

Let's equate half the playground | अर्धवट क्रीडांगणे सुसज्ज करू

अर्धवट क्रीडांगणे सुसज्ज करू

Next

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. तसा तो क्रीडा क्षेत्रातही ‘नंबरवन’ असला पाहिजे. क्रीडा क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी एकाग्रता व सकारात्मक दृष्टिकोन अंगी बाळगणे महत्त्वाचे आहे. तालुक्याच्या ठिकाणी असणारी क्रीडांगणे अर्धवट स्थितीत असून पुढच्या क्रीडादिनानिमित्त ती सर्व क्रीडांगणे सुसज्ज केली जाणार असल्याची ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी क्रीडा नैपुण्य शिष्यवृत्तीचे वितरण व खेळाडूंचा सत्कार कार्यक्रमात बोलताना दिली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस राष्ट्र्ीय क्रीडादिन २०१५-१६ निमित्त आयोजित क्रीडा नैपुण्य शिष्यवृत्तीचे वितरण व खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, कुडाळचे उपविभागीय अधिकारी रवींद्र बोंबले, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, यशस्वी खेळाडू, पुरस्कार प्राप्त विजेते, पालक, शिक्षक उपस्थित होते.
पालकमंत्री केसरकर म्हणाले, पूर्वी राजाश्रयामुळे गुणवंत खेळाडू घडत होते. आता राजाश्रयाची भूमिका शासनाकडे आली असून, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षणाबरोबरच खेळातही आघाडीवर असावा यासाठी या जिल्ह्यात अधिकाधिक गुणवंत खेळाडू घडावेत त्यासाठी त्यांना विविध सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी परिपूर्ण क्रीडा केंद्राच्या निर्मितीसाठी शासन पातळीवर कार्यवाही केली जाईल, अशी माहितीही पालकमंत्र्यांनी दिली.
जिल्हाधिकारी भंडारी म्हणाले, इथोपिया देशासारख्या छोट्याशा देशातील खेळाडू आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत पदक मिळवायचेच या ध्येयाने आणखी परिश्रम घेतात आणि यश संपादन करतात. त्याचप्रमाणे आपल्या खेळाडूंनीही आपले ध्येय गाठण्यासाठी झपाटून जायला हवे. गुणवंत खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाच्या क्रीडा विभागाने खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करणे आवश्यक आहे, असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
तसेच सन २०१४-१५ राष्ट्रीय शालेय महिला ग्रामीण (पायका) व इतर क्रीडा स्पर्धा पुरस्कारांचे वितरण केलेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे - अथर्व दीक्षित (सॉफ्टबॉल, डॉन बॉस्को हायस्कूल), सोहम शिंदे (बास्केटबॉल, रोसटिस इंग्लिश स्कूल मालवण), शिवप्रसाद देवकर (सॉफ्टबॉल, माधवराव पवार विद्यालय, मालवण), श्रीपाद नाईक (खेमराज मेमोरियल स्कूल सावंतवाडी), प्रवीण यादव (आंबोली पब्लिक स्कूल, - ज्युदो), नीरा आहेर (हॅण्डबॉल, खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा), शीतल नाईक (हॅण्डबॉल खेमराज इंग्लिश मीडियम स्कूल, बांदा), पूजा शेर्लेकर (खेमराज इंग्लिश स्कूल, हॅण्डबॉल), क्रिस्टन रॉड्रिक्स (मैदानी, कुडाळ हायस्कूल), विशाल बागायतकर (मैदानी - न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा, वेंगुर्ला), आशुतोष हेळकर (जलतरण - कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी), रोहिणी मिठबावकर (चॉकबॉल वराडकर हायस्कूल) या खेळाडूंना ६३ हजार ६०० रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले. (प्रतिनिधी)


२०१३-१४ राष्ट्रीय शालेय महिला ग्रामीण पायका
विराज मेस्त्री (सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी - रायफल शूटिंग), धनराज भोसले (मिलाग्रीस हायस्कूल, रायफल शूटिंग), श्रृतिका नार्वेकर (मिलाग्रीस हायस्कूल, रायफल शूटिंग), सिद्धाली वारंग (रायफल शूटिंग, मिलाग्रीस हायस्कूल), प्रतीक्षा लाड (रायफल शूटिंग - कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी), युक्ता सावंत (रायफल शूटिंग - मिलाग्रीस हायस्कूल), आशुतोष हेलकर (जलतरण - मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी), अक्षय पालव (थ्रो बॉल - लिंगेश्वर हायस्कूल, तुळसुली), नेहा पवार (तायक्वाँदो (ग्रामीण, सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल, परबवाडा, वेंगुर्ला) या सर्व खेळाडूंना १ लाख १६ हजार ९५० रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले.

४.५० लाखांचे अनुदान वाटप
सन २०१३-१४ मधील शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या प्रोत्साहनात्मक शाळांना अनुदान वितरित करण्यात आले. त्यामध्ये डॉन बॉस्को हायस्कूल, ओरोस, मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी, सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली, कासार्डे माध्यमिक विद्यालय या शाळांना चार लाख ५० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.

Web Title: Let's equate half the playground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.