‘टाटा मेटॅलिक’साठी पाठपुरावा करूया
By admin | Published: March 14, 2016 11:14 PM2016-03-14T23:14:29+5:302016-03-14T23:14:29+5:30
सतीश काळसेकर : माजी कामगारांच्या बैठकीत निर्णय
रेडी : रेडी येथील बंद असलेल्या टाटा मेटॅलिक संदर्भात कामगारांची समिती स्थापन करून ही कंपनी सुरू करण्यासाठी सकारात्मक पाठपुरावा करण्यासाठी सर्वजण पाठपुरावा करूया, असे आवाहन भाजपचे माजी अध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केले.
टाटा मेटॅलीक कंपनीच्या बैठकित ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, स्रेहा कुबल, राजू राऊळ, बाळू देसाई, सरपंच सुरेखा कांबळी, उपसरपंच दीपक राणे, कामगार प्रतिनिधी अरूण राणे, प्रसाद सौदागर, गफार खानापुरे, राजन केदार, मनाली करलकर, सुषमा खानोलकर, प्रशांत खानोलकर, प्रकाश रेगे, स्वप्नील नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टाटा मेटॅलिक कंपनी बंद होऊन तीन वर्षे झाली. या कंपनीचा जमीनदार व कंपनी यांच्यामध्ये जो करार झाला आहे, त्याचा अभ्यास करूया. तसेच रेडी गावचे सरपंच, लोकप्रतिनिधी, कामगार प्रतिनिधींनी एकत्र बसून राज्याचे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री व कामगारमंत्री यांची भेट घेऊन बंद असलेला टाटा मेटॅलिक प्रकल्प सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्याचा ठराव करण्यात आला.
टाटा मेटॅलिक कंपनीने जागतिक बाजारपेठेत टीआयर्नला मागणी व घसरलेले दर याचे कारण पुढे करून कंपनीने हा प्रकल्प कायमचा बंद करून झोपभट्ट्या व मशिनरी सामान भंगारात विकून कामगारवर्गावर बेकारीचे दिवस आणले. याबाबत सभेत कामगारवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आभार राजेेंद्र कांबळी यांनी मानले. (वार्ताहर)
मेक इन इंडियातून सुरू करावा
गेली तीन वर्षे बंद असलेला टाटा मेटॅलिक प्रकल्प सुरू करू शकले नाहीत. तो प्रकल्प शासनाने मेक इन इंडियाच्या माध्यमातून सुरू करावा किंवा टाटा मेटॅलिक कंपनीने तो प्रकल्प पुन्हा सुरू करावा, अशी कामगार वर्गातून मागणी करण्यात आली.