प्रदेशाध्यक्ष बदलासाठी कोणत्याही टोकाला जाऊ

By admin | Published: March 23, 2017 11:43 PM2017-03-23T23:43:35+5:302017-03-23T23:43:35+5:30

नीलेश राणे यांचा इशारा : अशोक चव्हाण काँग्रेस संघटनेसाठी दुखणे

Let's go to any extent for state presidential change | प्रदेशाध्यक्ष बदलासाठी कोणत्याही टोकाला जाऊ

प्रदेशाध्यक्ष बदलासाठी कोणत्याही टोकाला जाऊ

Next



रत्नागिरी : कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण हे राज्यभरातील कॉँग्रेस संघटनेसाठी दुखणे बनले आहेत. रत्नागिरी जिल्ह्याला गेल्या दोन वर्षांत जे अध्यक्ष देऊ शकले नाहीत, ते राज्यात कॉँग्रेसचे काय भले करणार? हे प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजेत. रत्नागिरीला जिल्हाध्यक्ष मिळाला पाहिजे. त्यासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. आम्ही टाळे लावू शकतो, गाड्या अडवू शकतो, टिळक भवनसमोर उभे राहू शकतो, असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कॉँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते गुरुवारी प्रथमच रत्नागिरीत आले होते. राणे यांनी यावेळी प्रदेश नेतृत्वावर खरपूस टीका केली. पदाचा राजीनामा का दिला? याची कारणे मी प्रसारमाध्यमांकडे स्पष्ट केली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही रत्नागिरीला जिल्हाध्यक्ष द्या, अशी मागणी करतो आहोत. त्यामुळे जिल्हा कार्यकारिणी, स्थानिक कमिट्या स्थापन करता येतील व पक्ष संघटना बळकट करता येईल, हे आमचे म्हणणे होते. मात्र, आधीच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर दोन वर्षे चव्हाणांना जिल्हाध्यक्षच सापडला नाही, ही कॉँग्रेससाठी मोठी शोकांतिका आहे.
राज्यभरातील इतर कॉँग्रेसजनांकडूनही प्रदेशाध्यक्षांबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे अशा नेतृत्वाखाली काम करणे योग्य वाटले नाही. म्हणूनच अशा कमिटीत राहणे अपमानास्पद वाटले. ा) राज्यभरातील इतर कॉँग्रेसजनांकडूनही प्रदेशाध्यक्षांबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे अशा नेतृत्वाखाली काम करणे योग्य वाटले नाही. म्हणूनच अशा कमिटीत राहणे अपमानास्पद वाटले. हे प्रदेशाध्यक्ष उर्वरित महाराष्ट्रात संघटनेचे काय भले करणार? असा सवालही त्यांनी केला. मी राजीनामा दिला असला तरी कॉँग्रेस कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. माझ्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. माझे पद महत्त्वाचे नाही. कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देऊ शकत नसेन तर पद कशासाठी हवे, असा सवालही त्यांनी केला.
यावेळी राणे म्हणाल, पक्ष हा कार्यकर्त्यांसाठी चालवावा. नेत्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी नको. जिल्ह्यात, राज्यात भाजप व सेना पुढे जात असताना कॉँग्रेस मात्र पिछाडीवर गेली आहे. कॉँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांना दिशा देणारे नेतृत्वच नाही. पक्षाने मला अनेक पदे दिली आहेत. त्यामुळे कॉँग्रेस पक्षात मी काल होतो, आज आहे व पुढेही असेन. रत्नागिरीला कोणीही जिल्हाध्यक्ष द्यावा, ही मागणी घेऊन मी दोनदा प्रदेशाध्यक्षांकडे गेलो होतो. मात्र, त्यांचे म्हणणेच कळत नाही. केंद्रीय निरीक्षक मोहन प्रकाश यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची नावे पाठविली असल्याचे चव्हाण म्हणतात. मात्र, खरेच अशी नावे त्यांनी पाठविली की नाही, हा मला पडलेला प्रश्न आहे, असेही ते म्हणाले. रत्नागिरीला कोणीही जिल्हाध्यक्ष द्या. तसे दोन ओळीचे पत्र पाठवा. आम्ही तो अध्यक्ष मान्य करू. मात्र, दिलेला पदाचा राजीनामा परत घेणार नाही, असेही राणे म्हणाले. (प्रतिनिधी)
..तर दुसऱ्या पक्षात वाजत गाजत जाऊ
माजी मुख्यमंत्री नारायण राणे कॉँग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याबाबत विचारता नीलेश राणे म्हणाले, कॉँग्रेस नेते नारायण राणे यांना बंद खोलीत निर्णय घेण्याची सवय नाही व गरजही नाही. ते याच पक्षात राहणार आहेत. याबाबत कॉँग्रेस पक्षातीलच काहीजणांकडून मुद्दाम अफवा पसरविल्या जात आहेत. आम्हाला जर दुसऱ्याच पक्षात जायचे असेल तर गुपचूप जाणार नाही, वाजत गाजत जाऊ, असेही ते म्हणाले.

Web Title: Let's go to any extent for state presidential change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.