सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध करण्याचा संकल्प करूया, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आवाहन 

By सुधीर राणे | Published: February 12, 2024 05:18 PM2024-02-12T17:18:08+5:302024-02-12T17:18:26+5:30

'भास्कर जाधव हे कृतघ्न'

Let's resolve to make Sindhudurg district prosperous, Union Minister Narayan Rane appeal | सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध करण्याचा संकल्प करूया, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आवाहन 

सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध करण्याचा संकल्प करूया, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आवाहन 

कणकवली: जनता हीच माझी संपत्ती आहे. हीच माझी लक्ष्मी आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आर्थिक दृष्ट्या समृद्ध करायचा आहे. त्यासाठी आपण सर्वांनी ही मोहीम हाती घेवून काम करूया. नवनवीन रोजगार, उद्योग उभे करण्यासाठी प्रयत्न करूया. त्यासाठी तुमची मला साथ आणि मार्गदर्शनही हवे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा  समृद्ध व्हावा यासाठी संकल्प करून पुढे चालूया, असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.

कणकवली येथे 'विकसित समृद्ध सिंधुदुर्ग जिल्हा व भारत'  या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, डॉ. प्रसाद देवधर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, भालचंद्र मराठे अशोक करंबेळकर, प्रज्ञा ढवण, नामदेव जाधव, मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री आदि मान्यवर उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले, चांगल्या मार्गाने पैसे मिळविण्यास लाज बाळगू नका. जीवनात ज्याने प्रगती येते त्या गोष्टी आत्मसात करा. गरीबीवर मात कशी करायची यावर बोलून मी थकलो आहे. मी राजकारणी असलो तरी प्रथमतः उद्योजक आहे.मी जपान, जर्मनी मध्ये मासे निर्यात करतो. हॉटेल इंडस्ट्रीत मी काम करतो आहे. मात्र इतर मच्छिमारांना माझ्यासारखा व्यवसाय करा म्हणून सगळी व्यवस्था करून दिली तरीही आपले लोक ती कामे करत नाहीत. मी आता गो शाळा बांधत आहे. शेळी, मेंढी आणि पोलट्री फार्म करतो आहे. शेण, गोमूत्र यापासून रंग बनविला जाणार आहे.  घर चालविण्यात एक गाय खूप मदत करू शकते. तुम्ही सुद्धा करावा असा हा उद्योग आहे. जिल्हातील लोक अशा गोष्टींना प्राधान्य देत नाहीत. अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भास्कर जाधव हे कृतघ्न !

भास्कर जाधव यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मी नेले होते. त्यांना उमेदवारी दिली. १५ लाख निवडणुकीसाठी खर्चासाठी दिले. मात्र तो माणूस कृतघ्न निघाला. तो माझ्या बद्दल बोलतो तेव्हा वाईट वाटते. किमान उपकार तरी विसरू नयेत. असे मंत्री नारायण राणे यावेळी म्हणाले.

Web Title: Let's resolve to make Sindhudurg district prosperous, Union Minister Narayan Rane appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.