कणकवली विभागातील तीन ठेकेदारांचा परवाना निलंबित, सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 05:11 PM2023-03-03T17:11:35+5:302023-03-03T17:11:59+5:30

'अपूर्ण कामे असलेल्या ठेकेदारांच्या निविदा उघडू नयेत'

License of three contractors in Kankavali Division suspended, action taken by Public Works Department | कणकवली विभागातील तीन ठेकेदारांचा परवाना निलंबित, सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई

कणकवली विभागातील तीन ठेकेदारांचा परवाना निलंबित, सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई

googlenewsNext

कणकवली : कामांचा ठेका घेऊन ती कामे अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारांबाबतही सार्वजनिक बांधकाम विभागाने कडक भूमिका घेत आहे. आतापर्यंत कणकवली विभागातील तीन ठेकेदारांचा परवाना एका वर्षासाठी निलंबित केल्चाची माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणारी कामे दर्जेदार व्हावीत व शासनाचा निधी योग्य प्रकारे विकासकामांकरिता वापरला जावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणारी कामे गुणवत्तापूर्ण होण्याची भूमिका घेण्यात आली आहे.

सर्वगोड म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणाऱ्या कामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड किंवा कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत. शासनाचा पर्यायाने सर्वसामान्य जनतेचा पैसा या विकासकामांसाठी दिला जातो. तो निधी योग्य जागी, योग्य प्रकारे खर्च व्हावा ही शासनाची भूमिका असते. त्यामुळे याबाबत कडक धोरण अवलंबण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जी कामे गेली अनेक महिने अपूर्ण स्थितीत ठेवण्यात आली आहेत. अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाहीदेखील सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

निविदा काढत असताना यापुढे अपूर्ण कामे असलेल्या ठेकेदारांच्या निविदा उघडू नयेत, अशी अटदेखील  घातली जाणार आहे. काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदारांची नावे यापुढे प्रसिद्धी माध्यमांना दिली जातील. अशी माहिती  सर्वगोड यांनी यावेळी दिली.

Web Title: License of three contractors in Kankavali Division suspended, action taken by Public Works Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.