सिंधुदुर्ग मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी निलंबित

By admin | Published: February 29, 2016 01:11 AM2016-02-29T01:11:55+5:302016-02-29T01:12:15+5:30

मात्र अपेक्षित खुलासा न झाल्याने मत्स्य विभागाने सुरेंद्र गावडे यांना पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत निलंबित केले आहे.

Licensing officer of Sindhudurg Fisheries Department suspended | सिंधुदुर्ग मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी निलंबित

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी निलंबित

Next

मालवण : सिंधुदुर्ग सहाय्यक मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी सुरेंद्र गावडे यांना पर्ससीन परवाने वितरित केल्याचा ठपका ठेवत राज्य शासनाने निलंबित केले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने पर्ससीन मासेमारीबाबत डॉ. सोमवंशी अहवाल स्वीकारला असताना परवाना अधिकाऱ्यांनी परवाने वितरित करताना घाई का केली? याबाबत कारणे दाखवा नोटीस गावडे यांना वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आली होती. मात्र अपेक्षित खुलासा न झाल्याने मत्स्य विभागाने सुरेंद्र गावडे यांना पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत निलंबित केले आहे.
दरम्यान, मत्स्य विभागाने न्यायालयीन निर्णयाचा आधार घेत महिन्याभरापूर्वी नव्याने आठ पर्ससीन परवाने वितरित केले होते. त्यात परवाना अधिकारी गावडे यांच्याकडून आचरा येथील आठ मिनी पर्ससीनधारकांना पर्ससीन परवाने मिळाले, तेही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तत्कालीन राज्य सरकारने सन २०१२ पासून पर्ससीन परवाने वितरित करण्यात येऊ नये, असे आदेश दिले होते. याबाबत पर्ससीन परवाने मिळावेत यासाठी आचरा येथील काही मच्छिमारांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर निर्णय देताना नियमांना तसेच राज्य शासनाच्या अधीन राहून पर्ससीन परवाने देण्यात यावेत, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते.

Web Title: Licensing officer of Sindhudurg Fisheries Department suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.