विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

By Admin | Published: March 17, 2015 11:47 PM2015-03-17T23:47:19+5:302015-03-18T00:04:13+5:30

बांद्यातील घटना : सहा तासाच्या प्रयत्नानंतर जेरबंद

Livelihood lying in the well | विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

googlenewsNext

बांदा : बांदा शहरातील एका विहिरीत मंगळवारी पहाटे भक्ष्याच्या शोधार्थ आलेला बिबट्या पडला. वनखात्याने ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला जेरबंद करण्यात यश मिळविले. या बिबट्याला पाहण्यासाठी शेकडो बांदावासीयांनी गर्दी केल्याने बांदा-दोडामार्ग मार्गावर सुमारे पाच तास वाहतूक खोळंबली होती.तोरप मैदानानजीक असलेल्या चंद्रकांत शेटकर यांच्या घरासमोरील विहिरीत मादी बिबट्या पडला. विहिरीला दगडी कठडा असल्याने, तसेच सुमारे २० फूट खोली असल्याने बिबट्याला विहिरीच्या बाहेर पडता आले नाही. मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत शेटकर पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेले असता विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याची कल्पना बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर यांना दिली.गडगेवाडी येथील विहिरीत बिबट्या पडल्याची वार्ता बांदा शहरात समजताच बांदावासीयांनी मोठ्या संख्येने बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली.
वनखात्याचे अधिकारी उशिरा दाखल
विहिरीत पाण्याची पातळी कमी असल्याने बिबट्या (
विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
) पाण्याच्या पंपावर बसून होता. दरम्यानच्या काळात स्थानिकांनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वनखात्याचे अधिकारी ९ वाजता घटनास्थळी आल्याने त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. बिबट्याला पकडण्यासाठीचा पिंजरा कुडाळ येथून १० वाजता आणण्यात आला. वनक्षेत्रपाल एस. बी. पाटील, बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर, वनरक्षक पृथ्वीराज प्रताप, अमित कटके, जे. बी. गावडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ सुशांत पांगम, राजेश विर्नोडकर, सुभाष शिरोडकर, विनायक दळवी, विकी केरकर, स्वप्निल सावंत, सुनील नाटेकर, संदेश पावसकर, मिलिंद सावंत, आनंद गवस, गिरीश नाटेकर यांनी बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले.
आठ तासांहून अधिक काळ पाण्यात राहिल्याने हा बिबट्या आक्रमक झाला होता. वैद्यकीय तपासणीनंतर या बिबट्याला दुपारनंतर सुरक्षितरीत्या आंबोलीच्या जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी सरपंच मंदार कल्याणकर, उपसरपंच बाळा आकेरकर, शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, पंचायत समिती सदस्य श्वेता कोरगावकर, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

वाहतूक खोळंबली
बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी झाल्याने, तसेच या मार्गावर कळणे मायनिंगची वाहतूक करणारे डंपर असल्याने बांदा-दोडामार्ग मार्गावर वाहतुकीचा सुमारे पाच तास खोळंबा झाला. पोलीस उपनिरीक्षक सुधाकर आरोलकर, सचिन नावडकर यांनी सहकाऱ्यांंसह वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

Web Title: Livelihood lying in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.