सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्जमाफीची पूर्तता नाही, शरद पवार गट आक्रमक
By अनंत खं.जाधव | Published: June 20, 2024 12:35 PM2024-06-20T12:35:34+5:302024-06-20T12:36:01+5:30
जिल्हाधिकारी यांना निवेदन
सावंतवाडी : सिधुदुर्गातील शेतकऱ्यांना सरकारने घोषित केलेल्या कर्ज माफीबाबतची अद्याप पूर्तता केलेली नाही. यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतर्गत उर्वरित शेतकऱ्यांना लाभ मिळावा, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतर्गत दोन लाखांवरील शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच खावटी कर्जमाफी व खावटी कर्जमाफीची मुदत वाढविण्याबाबत व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे जिल्हाधिकारी यांना देऊन त्यांचे लक्ष वेधण्यात आले.
मागण्या मान्य न झाल्यास ३ जुलैपासून जिल्हास्तरीय आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. राज्य सरकारने कार्यवाही करून शेतकन्यांना न्याय मिळवून न दिल्यास पावसाळी अधिवेशनात विधान भवनासमोर शेतकयांसह ठाण मांडून बसू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना पारे-परब यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना शेतक-यांच्या प्रश्नांबाबत अर्चना घारे परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय आदींसह राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्षा अॅड. रेवती राणे, पुंडलिक दळवी,सायली पाटकर,सुनीता भाईप, सुधा सावंत आदी उपस्थित होते.
पीकविमा घेऊन तो सलग तीन वर्षे नियमितपणे वर्षाच्या आत परतफेड अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान आदेश दिले होते. पण, काही ठराविक शेतकन्यांना यात हे अनुदान मिळाले असून बाकीच्या शेतकयांनाही ते तात्काळ मिळाले पाहिजे. खावटी कर्जमाफीबद्दल सरकारने आदेश काढला असून यासाठी ३१ मार्च २०१६ मध्ये ७५६४ शेतकयांनी खावटी कर्ज घेतेले होते.
या सर्व शेतकऱ्याचे कर्ज माफ करण्याचा सरकारने आदेश दिला होता. पण, यावर काही निर्णय घेण्यात आला नसून या शेतक-यांच्या कर्जावरील व्याजाची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. यावर तत्कालीन सहकारमंत्री अतुल सावे यांनी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्ज रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल सरकारकडून आदेश काढण्यात आला होता मात्र अजून ती रक्कमही शेतक-यांच्या कर्ज खात्यात जमा झाली नाही. दोन लाखावरील थकबाकी असणारे शेतकरी मध्यम भूधारक आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात कोणताही निर्णय झाला नसून यात अनेक शेतकरी कर्जमाफी होण्याप्रतीक्षेत आहेत.
हे सर्व सरकारने गांभीर्यानि घेऊन लवकरात लवकर मार्गी लावावेत अशी मागणी जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली. अन्यथा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.