Lok Sabha Election 2019    विरोधकांच्या गैरप्रचाराला  बळी पडू नका ! विनायक राऊत यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 04:42 PM2019-04-03T16:42:29+5:302019-04-03T16:44:13+5:30

कणकवली :विरोधकांना लोकसभा निवडणुकीत आपला शंभर टक्के पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे शिवसेना - भाजप महायुती बाबत ते मतदारांमध्ये ...

Lok Sabha Election 2019 Do not fall prey to the opposition! Appeal of Vinayak Raut | Lok Sabha Election 2019    विरोधकांच्या गैरप्रचाराला  बळी पडू नका ! विनायक राऊत यांचे आवाहन

Lok Sabha Election 2019    विरोधकांच्या गैरप्रचाराला  बळी पडू नका ! विनायक राऊत यांचे आवाहन

Next

कणकवली :विरोधकांना लोकसभा निवडणुकीत आपला शंभर टक्के पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे शिवसेना - भाजप महायुती बाबत ते मतदारांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या रक्तात बेईमानी भरलेली नाही. ते निष्ठावान कार्यकर्ते असून  विरोधकांच्या गैर प्रचाराला ते कधीही बळी पडणार नाहीत. असा ठाम विश्वास  रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला .

        कणकवली येथे महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन बुधवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  यावेळी आमदार वैभव नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, भाजपा नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, राजश्री धुमाळे, जान्हवी सावंत, नीलम सावंत - पालव, शैलेश भोगले, सुशांत नाईक, संजय पडते, रमेश पावसकर, संदेश सावंत -पटेल, सुजित जाधव, गीतेश कडू ,  हर्षद गावडे, राजू राठोड, आंबडपाल सरपंच प्रणिता नाईक , धनंजय सावंत तसेच सेना - भाजपाचे नगरसेवक आदी  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  

        यावेळी विनायक राऊत म्हणाले, शिवसेना, भाजप व इतर पक्षांची महायुती व्हावी ही भारत मातेची इच्छा होती. त्यामुळे महायुती झाली आहे. सिंधुदुर्गचाच नव्हे तर देशाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर महायुतीची सत्ता पुन्हा येणे आवश्यक आहे. त्यामुळे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यानी एकदिलाने काम करावे आणि आपली  संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करावे. विरोधकांना आपला पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने या लोकसभा मतदार संघातून विनायक राऊत या नावाचा डमी उमेदवार उभा करण्याचे षढयंत्र रचले जात आहे. मात्र, जनता खऱ्या विनायक राऊतला चांगलीच ओळखत असल्याने काहीच फरक पडणार नाही असा टोलाही विनायक राऊत यांनी यावेळी विरोधकांना लगावला .

         प्रमोद जठार म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्यानाही आता उमका फुटू लागली आहे. हे महायुतीसाठी शुभ संकेत आहेत. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवाना बळी पडू नये. शिवसेना- भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष व्हावा, त्यांच्यात मारामाऱ्या व्हाव्यात यासाठी विरोधक प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या डावपेचाना बळी पडू नका. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांची नाराजी आता राहिली नसून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी सर्वानी एकदिलाने काम करावे. शिवसेना- भाजप व इतर मित्र पक्षानी या निवडणुकीत आपल्या एकजुटीची ताकद दाखवून द्यावी .असे आवाहनही प्रमोद जठार यांनी यावेळी केले.

        भाजप नेते संदेश पारकर, अतुल रावराणे यांनीही कार्यकर्त्याना संबोधित करताना महायुतीचा धर्म पाळण्याचे आवाहन केले.  आमदार वैभव नाईक यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटना नंतर कणकवली शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली.

जोरदार घोषणा बाजी !

कोण आला रे कोण आला...शिवसेनेचा वाघ आला, शिवसेना -भाजपा युतीचा..विजय असो, मोदी साहेब आगे बढो...शिवसेना तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.

-फोटो ओळ-- कणकवली येथील महायुतीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार विनायक राऊत यांनी कार्यकर्त्याना संबोधित केले. यावेळी आमदार वैभव नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, भाजपा नेते अतुल रावराणे, संदेश पारकर आदी उपस्थित होते.

Web Title: Lok Sabha Election 2019 Do not fall prey to the opposition! Appeal of Vinayak Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.