Lok Sabha Election 2019 हॉस्पिटल, पंप बांधून कोणाचा विकास केला? : --दीपक केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 04:56 PM2019-04-18T16:56:12+5:302019-04-18T16:57:09+5:30
जिल्ह्याचा विकास केला, असे सांगणाºया राणेंनी हॉस्पिटल, पेट्रोल पंप, हॉटेल बांधून नक्की कोणाचा विकास केला याचे उत्तर द्यावे, असा सवाल पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला. मागच्यावेळी राक्षसाला विधानसभेत रोखले. आता नरकासुराला रोखून दिवाळी साजरी करूया
सावंतवाडी : जिल्ह्याचा विकास केला, असे सांगणाºया राणेंनी हॉस्पिटल, पेट्रोल पंप, हॉटेल बांधून नक्की कोणाचा विकास केला याचे उत्तर द्यावे, असा सवाल पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला. मागच्यावेळी राक्षसाला विधानसभेत रोखले. आता नरकासुराला रोखून दिवाळी साजरी करूया आणि जिल्ह्यातील दहशतवादाचा बिमोड करूया, असे आवाहन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
माडखोल व आंबोली येथे शिवसेना-भाजप युतीच्यावतीने प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार विनायक राऊत, माजी आमदार राजन तेली, म्हाडाचे संचालक शैलेश परब, राजू राऊळ, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, तालुकाध्यक्ष महेश सारंग, बाळू माळकर, अशोक परब, उद्योजक पुष्कराज कोले, जान्हवी सावंत, विक्रांत सावंत, रोहिणी गावडे, उत्तम पारधी, मंदार शिरसाट, अशोक दळवी, रुपेश राऊळ, मोहन चव्हाण, रश्मी माळवदे, रामजी रावराणे, सरपंच लीना राऊत, चौकुळ सरपंच रिता गावडे, विजय गावडे, सुषमा गावडे, विजय गावडे, बबन गावडे, रोशनी पारधी, प्रियंका जाधव, रुपेश गावडे आदी उपस्थित होते.
स्वत:चा विकास करणारे जिल्ह्याचा विकास करू शकणार नाहीत. त्यामुळे अशांना वेळीच बाजूला करा. जिल्ह्यात काही आले तरी मीच आणले असे सांगितले जात होते. मी एका गरीब घरातून इथपर्यंत पोहोचलो. मात्र सोन्याचा चष्मा घेऊन जन्माला आलेल्यांना सर्वसामान्यांचे जीवन कसे कळणार, असा टोला विनायक राऊत यांनी निलेश राणेंचे नाव न घेता हाणला.यावेळी उद्योजक पुष्कराज कोले व शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरात आदींनी राणेंवर टीका केली.
आम्ही जिल्ह्याचा विकास करताना टक्केवारी मागितली नाही : विनायक राऊत
खासदार राऊत म्हणाले, नॉन मॅट्रिक माणसाने मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण करून एम.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेल्या व्यक्तीस बोलणे म्हणजे हास्यास्पद आहे. आम्ही जिल्ह्याचा विकास करताना टक्केवारी मागितली नाही. म्हणूनच निधी पूर्ण खर्च झाला.
माझ्यावर टीका करणारे कितीवेळा संसदेत गेले ते सांगावे, अशी टीका राऊत यांनी केली. खासदार राऊत पुढे म्हणाले, पालकमंत्री आणि खासदार यांच्यावर टीका करण्यापलीकडे कोणतेही काम राणे यांनी केले नाही.
माझ्यावर टीका टिप्पणी करून मते मिळणार नाहीत हे राणे कंपनीला कळून चुकले आहे. आपण वैयक्तिक टीका करणार नसून गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावरच मतदारांच्या समोर जात आहे, असेही राऊत म्हणाले.
माडखोल येथील सभेत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी टीका केली. यावेळी विनायक राऊत, मायकल डिसोझा, बाळू माळकर आदी उपस्थित होते.