‘लोकमत’ ने जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले

By admin | Published: November 5, 2015 11:04 PM2015-11-05T23:04:35+5:302015-11-06T00:01:38+5:30

संतोष भिसे यांचे गौरवोद्गार : कणकवलीत ‘लोकमत दीपोत्सव २0१५’ चे प्रकाशन

'Lokmat' created a personal relationship | ‘लोकमत’ ने जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले

‘लोकमत’ ने जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले

Next

कणकवली : गतवर्षी १ लाख प्रतिंचा विक्रमी ठप्पा गाठणाऱ्या आणि दिवाळी अंकामधील मानबिंंदू समजल्या जाणाऱ्या ‘लोकमत दीपोत्सव २0१५’ च्या अंकाचे प्रकाशन कणकवलीचे प्रांताधिकारी संतोष भिसे यांच्याहस्ते गुरूवारी सायंकाळी करण्यात आले. ‘लोकमत’ ने वाचकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे. ते टिकविण्यासाठी राबवित असलेले विविध उपक्रम समाजाला नेहमीच उपकृत करतात, असे उद्गार यावेळी भिसे यांनी बोलताना व्यक्त केले.
‘लोकमत’च्या कणकवली येथील जिल्हा कार्यालयात झालेल्या या प्रकाशन समारंभाला कणकवलीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार आणि वितरक अशोक करंबेळकर आणि ‘लोकमत’ परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. प्रांताधिकारी भिसे म्हणाले, ‘लोकमत’ हे परिपूर्ण दैनिक असून आपण सातत्याने विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. सन २0१३ साच्या दीपोत्सव आजही माझ्याकडे आहे. तो मी जपून ठेवला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जिवनात वाचनासाठी लोकांना फार कमी वेळ मिळतो. मात्र, असे असले तरी दिवाळी अंक वाचणाऱ्या वाचकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. दीपोत्सव तयार करण्यासाठी ‘लोकमत’ची सर्व टीम घेत असलेली मेहनत या अंकाच्या पानापानातून दिसत आहे. सूत्रसंचालन आवृत्तीप्रमुख महेश सरनाईक यांनी केले.(प्रतिनिधी)


लोकमत हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘लोकमत’ने अल्पावधीत वाचकांशी वेगळे नाते जोडले आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ‘लोकमत’ ने सुरूवातीपासून पुढाकार घेतला. विविध योजनांमधून आणि स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लावली.
- माधुरी गायकवाड, नगराध्यक्षा, कणकवली

दिवाळी अंक कसा असावा याचे उदाहरण म्हणून दीपोत्सवाकडे पहावे लागेल. गतवर्षी महाराष्ट्रात १ लाख प्रति विक्री करून वेगळा आदर्श निर्माण केला. समाजातील वेगवेगळ्या घटकांचे प्रतिनिधीत्व करून ते विधायक दृष्टीकोनातून मांडण्याचा टीमचा प्रयत्न कौतुकास्पद असाच आहे.
- अशोक करंबेळकर, ज्येष्ठ पत्रकार, कणकवली

Web Title: 'Lokmat' created a personal relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.