सावंतवाडीतून धावली लांब पल्ल्याची एसटी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 02:24 AM2020-06-23T02:24:08+5:302020-06-23T02:24:18+5:30
पुणे-निगडी ही राज्यांतर्गत लांब पल्ल्याची पहिली एसटी बस २२ प्रवाशांना घेऊन रवाना झाली. या बससाठी प्रवाशांनी ग्रुप बुकिंग केले.
सावंतवाडी : सावंतवाडी एसटी आगारातून तब्बल पावणेतीन महिन्यांनंतर पुणे-निगडी ही राज्यांतर्गत लांब पल्ल्याची पहिली एसटी बस २२ प्रवाशांना घेऊन रवाना झाली. या बससाठी प्रवाशांनी ग्रुप बुकिंग केले. लॉकडाऊन काळात पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली होती. एसटी महामंडळाच्या सावंतवाडी आगारातून ही गैरसोय दूर कण्यासाठी पुणे येथे जाणाºया प्रवाशांना गु्रप बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी २२ प्रवाशांची संख्या असणे आवश्यक होते.
प्रासंगिक कराराअंतर्गत ही बस सेवा सुरू करण्यात आली असून वैद्यकीय दाखला व आधारकार्ड त्यासाठी आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजता ही बस पुणे-निगडी येथे रवाना झाली. प्रवाशांना आगरातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. या गु्रप बुकिंगला मिळालेला प्रतिसाद पाहून पुणे येथे ही फेरी सोडण्यात येणार आहे. ज्या प्रवाशांना प्रवास करायचा आहे त्यांनी सावंतवाडी आगारात नावे नोंदवावीत, असे आवाहन आगार व्यवस्थापकांनी केले.
>प्रासंगिक करारांतर्गत सेवा
लॉकडाऊन काळात एसटी बस सेवा बंद होती. पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाअंतर्गत काही एसटी फेºया सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, कोल्हापूर, मुंबई, पुणे या लांब पल्ल्याच्या एसटी बसेस बंद होत्या. प्रासंगिक करार या योजनेंतर्गत ही सेवा असून तसे भाडे आकारले जात आहे. प्रवाशांना त्यांचा वैद्यकीय दाखला व आधारकार्ड देणे बंधनकारक केले आहे.