‘त्यांच्यावरील’ कारवाईकडे लक्ष

By admin | Published: December 9, 2014 10:28 PM2014-12-09T22:28:20+5:302014-12-09T23:19:19+5:30

बंधाऱ्यांचे उद्दिष्ट : कृषी विभाग, सामाजिक वनीकरणचे दुर्लक्ष

Look at the 'action' on them | ‘त्यांच्यावरील’ कारवाईकडे लक्ष

‘त्यांच्यावरील’ कारवाईकडे लक्ष

Next

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी व संभाव्य पाणीटंचाईवर मात व्हावी यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने आतापर्यंत ६ हजार ७०० बंधाऱ्यांपैकी २४९६ बंधारे बांधून पूर्ण केले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी विभाग व सामाजिक वनीकरण या दोन विभागांना त्यातीलच १७०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट असून त्यांनी अद्यापपर्यंत एकही बंधारा पूर्ण केला नसल्याची बाब प्रशासनाच्या अहवालातून उघड झाली आहे. त्यामुळे या दोन विभागांवर प्रशासन कोणती कारवाई करते यावर लक्ष लागून राहिले आहे.साधारणत: मे अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पाणीटंचाई भासण्यास सुरूवात होते. त्यातच यावर्षी पाऊसही कमी झाल्याने व भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जात असल्याने यावर्षीही मे अखेर पाणीटंचाई भासण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा परिषद प्रशासनाने यावर्षीही कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे ठरविले. त्यानुसार ६७०० बंधाऱ्यांचे उद्दिष्टही प्रत्येक तालुक्यात विभागून दिले. आठ तालुक्यांना ५ हजाराचे टार्गेट तर राज्य शासनाच्या कृषी विभाग १५०० व सामाजिक वनीकरण विभागाला २०० असे बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट विभागून देण्यात आले.
मात्र, तालुक्यातून ५ हजार बंधाऱ्यापैकी जवळजवळ ५० टक्के काम पूर्ण झाले असून २४९६ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. हे काम समाधानकारक आहे. मात्र, राज्य कृषी विभाग व सामाजिक वनीकरण विभाग या दोघांनी अद्यापही भोपळा फोडलेला नाही, अशी माहिती प्रशासनाच्या अहवालावरून उघड झाली आहे. (प्रतिनिधी)

लघुपाटबंधारे विभागाकडून पत्र
कृषी व सामाजिक वनीकरण विभागाने अद्याप एकही बंधारा न घातल्याने लघुपाटबंधारे विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठवून लक्ष वेधण्यात येणार आहे, अशी माहिती लघुपाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
कृषी विभाग निद्रीस्तच
या ना त्या कारणाने नेहमीच टार्गेटवर असणारा राज्य शासनाचा कृषी विभाग बंधाऱ्याच्या बाबतीतही उदासीनच दिसून येत आहे. बंधाऱ्याच्या बाबतीत अद्यापही खाते न उघडल्याने ‘गोत्यात’ येणार आहे.
प्रशासन कारवाई करणार?
अद्यापही कृषी व सामाजिक वनीकरण विभागांनी कच्चे व वनराई बंधारे न बांधल्याने या विभागावर प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन विभागांना हे बंधाऱ्यांचे उद्दिष्ट दिले होते. गतवर्षीही या दोन्ही विभागाकडून उदासीनताच दाखविण्यात आली होती. गतवर्षी कृषी विभागाने १५०० बंधाऱ्यांपैकी ४२१ तर सामाजिक वनीकरणने २०० पैकी ८४ बंधारे बांधले होते.


तालुकाउद्दिष्टकच्चेवनराईएकूणटक्केवारी
बंधारेबंधारे
कणकवली८५०३२११९९५२०६१.१८
कुडाळ८५०१६५१५४३१९३९.८८
दोडामार्ग३००१५५५७०२३.३३
वेंगुर्ला४००७०१७८२४४६२.००
मालवण८००२३३६४२९७३७.१३
देवगड७००६४१५८२२२३१.७१
सावंतवाडी८५०४२६२५६६७७८.४७
वैभववाडी३००७५७८१५३५१.००
एकूण५०००९८५१५११२४९६४९.९२

राज्य कृषी व सामाजिक वनीकरण विभाग

विभागउद्दिष्टसाध्य
राज्यशासन कृषी १५०० ०
सामाजिक वनीकरण२०० ०

Web Title: Look at the 'action' on them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.