Shivaji Maharaj Statue Collapse: जयदीप आपटेविरोधात लूक आउट नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 12:20 PM2024-09-04T12:20:28+5:302024-09-04T12:21:09+5:30

राजकोट पुतळा दुर्घटनेत आपटेवर गंभीर गुन्हा दाखल

Look out notice against Jaideep Apte in connection with the fall of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Rajkot Fort in Malvan | Shivaji Maharaj Statue Collapse: जयदीप आपटेविरोधात लूक आउट नोटीस

Shivaji Maharaj Statue Collapse: जयदीप आपटेविरोधात लूक आउट नोटीस

मालवण : मागच्या आठवड्यात मालवण येथे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. याप्रकरणी प्रमुख आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटे फरार असून, गेल्या आठ दिवसांपासून पोलिस त्याचा शोध घेत आहेत, मात्र, त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. सिंधुदुर्ग पोलिसांनी अखेर त्याच्याविरुद्ध मंगळवारी ‘लूक आउट’ नोटीस जारी केली आहे.

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याच्यासह बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटीलवर सदोष वधाचा प्रयत्न, शासनाची फसवणूक व अन्य गंभीर कलमांतर्गत मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चेतन पाटील मालवण पोलिसांच्या कोठडीत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता अजित पाटील यांनी दिलेल्या तकारीनुसार, राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सुरक्षितता लक्षात घेऊन हा पुतळा शतकानुशतके सुस्थितीत सुरक्षित व दिमाखाने उभा राहण्याच्या दृष्टीने परिपूर्ण व त्यासंदर्भात आवश्यक अशी सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक होते; परंतु शिल्पकार व बांधकाम सल्लागार यांनी हा पुतळा कोसळला तर पुतळ्याच्या जवळील पर्यटक व इतर लोकांचा मृत्यू होईल, तसेच अपरिमित जीवित व वित्तहानी होईल याची पूर्ण जाणीव असतानाही अभ्यास न करता पुतळ्याची निकृष्ट दर्जाने उभारणी केली.

तरी जयदीप आपटे व डॉ. चेतन पाटील यांनी एकमेकांच्या संगनमताने हे कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर मालवण पोलिसांत भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०९, ११०, १२५, ३१८, ३(५), ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Look out notice against Jaideep Apte in connection with the fall of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Rajkot Fort in Malvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.