दक्षिण कोकणातील प्रतिपंढरपूर असलेल्या सोनुर्ली माऊलीच्या दर्शनाला लोटला जनसागर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2017 06:47 PM2017-11-05T18:47:34+5:302017-11-05T18:47:55+5:30
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या श्रीदेवी माऊलीच्या वार्षिक जत्रोसवाला लाखो भक्तांनी गर्दी केली आहे.
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या श्रीदेवी माऊलीच्या वार्षिक जत्रोसवाला लाखो भक्तांनी गर्दी केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह, गोवा, कर्नाटक येथून भाविक दाखल झाले आहेत.
भक्तिमय वातावरणात ह्या जत्रोत्सवाला सुरुवात झाली. सकाळी 6.30 वाजल्यापासून भक्तांनी रांगा लावल्या होत्या. यावर्षी भक्तगणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देवी माऊलीचा महिमा अफाट असल्याने भक्तगण यात दिवसे दिवस वाढ होताना दिसत आहे, पूर्ण मंदिर परिसर ते अर्ध्या किमी पर्यंत भक्तांच्या रांगा लागल्या होत्या.
श्री देवी माऊली देवस्थान कमिटी, ग्रामस्थ मित्रमंडळ, ग्रामस्थ, पोलीस प्रशासन यांनी यावर्षी चांगले नियोजन केले होते. तसेच पार्किंग व्यवस्थेत एसटी बस गाड्यांसाठी वेगळा नियोजनबद्ध मार्ग त्यामुळे यावर्षी देवी माऊलीच्या भक्तांना सुलभ दर्शन घेता येत होते. भक्तांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. सोनुर्ली माऊली परिसर माऊली देवीच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. पूर्ण मंदिर परिसर तसेच 1 किमीपर्यंत दुकाने, व्यापारी वर्गाने थाटली होती. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी या जत्रोत्सवाला झाली. तर पूर्ण मंदिर रोषणाईनं झगमगून गेले होते. पूर्ण सोनुर्ली गाव भक्तिमय वातावरणात गजबजले होते.
लोटांगणाने नवस फेडणार
या जत्रोत्सवाचे आकर्षण म्हणजे लोटांगण. रात्री हजारो भाविक उघड्या अंगाने मंदिराच्या भोवती लोटांगण घालत मनातील बोललेला नवस फेडतात. हा सोहळा पाहण्यासारखा असतो. दुसऱ्या दिवशी या जत्रोत्सवाची सांगता होते.