स्वयंरोजगारासाठी ‘लुपिन’चे सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2016 09:31 PM2016-07-05T21:31:28+5:302016-07-06T00:27:13+5:30

नीलेश मोरजकर : कौशल्यवृद्धी प्रशिक्षण शिबिर उत्साहात

Lupine collaboration for self-employed | स्वयंरोजगारासाठी ‘लुपिन’चे सहकार्य

स्वयंरोजगारासाठी ‘लुपिन’चे सहकार्य

Next

बांदा : ग्रामीण भागातील महिला या स्वावलंबी असून स्वयंरोजगारातून त्यांनी आर्थिक उन्नती साधली आहे, हे कौतुकास्पद आहे. केवळ नोकरीच्या मागे न धावता स्वयंरोजगारातून कुटुंब चालवू शकता येते हे येथील महिलांनी सिध्द केले आहे. स्वयंरोजगारासाठी लागणारे मार्गदर्शन व आर्थिक पाठबळ लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून मिळत असल्याने ग्रामीण भागातील महिलांनी याचा सर्वतोपरी लाभ घ्यावा, असे आवाहन बांदा मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष नीलेश मोरजकर यांनी येथे केले.
लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून कौशल्यवृद्धी प्र्रशिक्षण शिबिरात शिवणक्लास प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण केले. यावेळी मोरजकर बोलत होते. यावेळी मराठा समाज मंडळाचे खजिनदार राकेश परब, लुपिनचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी आनंद वसकर, प्रशिक्षिका पूजा बांदेकर आदी उपस्थित होते.
तीन महिने कालावधीच्या या प्र्रशिक्षण शिबिराचा लाभ बांदा, शेर्ले, मडुरा, विलवडे, इन्सुली, असनिये, वाफोली गावातील १५ महिलांनी घेतला. राकेश परब म्हणाले की, ग्रामीण भागात महिला बचतगटांचे जाळे मोठे असून याद्वारे महिला विविध उपक्रम राबवित आहेत. आनंद वसकर म्हणाले की, लुपिन फाउंडेशनचे महिलांसाठी विविध उपक्रम आहेत. यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. बेरोजगार युवक, युवती यांना लुपिनच्या माध्यमातून हॉटेल मॅनेजमेंट, नर्सिग, चालक प्रशिक्षण, काजु युनिट मार्गदर्शन, शिवणक्लास तसेच महिलांना उपयुक्त असे व्यवसाय मार्गदर्शन देण्यात येते. याचा महिलांनी लाभ घ्यावा. स्वागत आनंद वसकर यांनी केले. आभार पूजा बांदेकर यांनी मानले. (प्रतिनिधी)

‘लोकमत’च्या बचतगट सदराचे कौतुक
‘लोकमत’ने नेहमीच महिलांविषयक उपक्रम राबविले आहेत. ग्रामीण भागातील महिला या बचतगटांच्या माध्यमातून कार्यरत असतात. या महिला बचतगटांच्या कार्याची यशोगाथा ‘लोकमत’ने आपल्या ‘बचतगटांची यशोगाथा’ या सदरामधून प्रसिद्ध केल्याने यावेळी लोकमतच्या उपक्रमाचे कौतुुक करण्यात आले.

Web Title: Lupine collaboration for self-employed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.