मुंबईमार्गे गोव्याला जाणारी लक्झरी बस जळाली, बसमधील 37 प्रवासी सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 09:14 IST2022-02-03T09:12:32+5:302022-02-03T09:14:00+5:30
पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन गाडीतील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. या गाडीमध्ये एकूण ३७ प्रवाशी होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुंबईमार्गे गोव्याला जाणारी लक्झरी बस जळाली, बसमधील 37 प्रवासी सुरक्षित
वैभववाडी : तालुक्यातील एडगाव ,घाडीवाडी येथे आज पहाटे ३.४५ च्या मनाने मुंबई ते गोवा जाणारी आरामबसला (मनीष ट्रॅव्हल्स) क्र GA 03/ W 2518 करूळ घाटात शॉर्टसर्किटने आग लागली.
पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन गाडीतील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. या गाडीमध्ये एकूण ३७ प्रवाशी होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी कणकवली व कुडाळ पोलीस स्टेशनची संपर्क साधून अग्निशामक बंब आणण्यात आले. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. मात्र, या घटनेमुळे दोन तास घाटातील वाहतूक ठप्प झाली होती.