सावंतवाडीत येताच पोलिसांकडून नोटीस, उद्धवसेनेचे शरद कोळी यांचा प्रशासनावर संताप
By अनंत खं.जाधव | Published: November 13, 2024 01:59 PM2024-11-13T13:59:11+5:302024-11-13T13:59:55+5:30
Maharashtra Assembly Election 2024: सिंधुदुर्ग जिल्ह्यात उध्दव सेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आलेली मुलुखमैदान तोफ उपनेते शरद कोळी यांना सावंतवाडी पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली असूून प्रशोभक भाषण करू नये म्हणून म्हणून ही नोटीस असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात उध्दव सेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आलेली मुलुखमैदान तोफ उपनेते शरद कोळी यांना सावंतवाडी पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली असूून प्रशोभक भाषण करू नये म्हणून म्हणून ही नोटीस असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.मात्र या नोटीसीवरून कोळी चांगलेच संतापले असूून मला जशी नोटीस दिली तशी आमदार नितेश राणे यांना द्या त्याची प्रशोभक भाषा तुम्हाला चालते का असा सवाल उपस्थित केला आहे.
उपनेते कोळी हे मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले त्यांनतर त्याना ते राहात असलेल्या हॉटेल मध्ये जाऊन पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली रात्री उशिरा नोटीस दिल्यामुळे कोळी चांगलेच संतापले होते.मात्र नंतर त्यांनी नोटीस स्वीकारली मात्र या नोटीसीवरून बुधवारी सावंतवाडीत झालेल्या सभेत प्रशासनावर टीकास्त्र सोडले मला जशी नोटीस बजावण्यात आली तशी नोटीस राणे ना का बजावण्यात येतील नाही असा सवाल केला पण मी गप्प राहाणार नाही कणकवलीत जाऊन बोलणारच मला काय अडवायचे ते अडवा असे खुले आव्हान ही कोळी यांनी दिला.
सभेत खासदार नारायण राणे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गाडी अडवण्याचा जो इशारा दिला होता त्यावरही कोळी यांनी राणे यांना आव्हान दिले ठाकरे यांच्या गाडीच्या पुढे माझी गाडी असणार तुमच्यात हिंमत असेल तर आमची गाडी आडवूनच दाखवा असे आव्हान ही कोळी यांनी दिला.