कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 30, 2024 05:18 PM2024-10-30T17:18:07+5:302024-10-30T17:20:07+5:30

निवडणूक निर्णय अधिकारी आल्या बाहेर

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Argument between Mahayuti, Uddhav Sena workers during application hearing for Kudal Malvan Assembly Constituency | कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला

कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला

कुडाळ : विधानसभा उमेदवार अर्ज छाननी प्रक्रिया शांतपणे सुरू असतानाच बुधवारी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाखाली तहसीलदार कार्यालयाच्या गेटवरच महायुती आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. दोन्ही गटांतील समजूतदार पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण शांत केले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना बाहेर काढले. यामुळे वातावरण काही काळ तंग झाले होते.

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाच्या अर्ज सुनावणीवेळी एका अपक्ष उमेदवाराच्या अर्जाला आक्षेप घेत त्या उमेदवाराच्या एका सूचकाची सही खोटी मारल्याचा आक्षेप घेण्यात आला. ज्याची खोटी सही मारल्याचा आक्षेप होता त्याने ती सही आपली नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी एका तासाचा वेळ दिला. त्याप्रमाणे ते प्रतिज्ञापत्र करण्यासाठी संबंधित सूचक तहसीलदार कार्यालयात आले असता प्रांत कार्यालयाच्या मुख्य दरवाजातच दोन्ही गट एकमेकांना भिडले.

निवडणूक निर्णय अधिकारी आल्या बाहेर

ज्यावेळी हे दोन्ही गट एकमेकांना भिडले त्यावेळी सुरुवातीला तेथे कोणी पोलिससुद्धा उपस्थित नव्हते. काही वेळाने पोलिस दाखल झाले. मोठा आरडाओरडा ऐकून निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसेदेखील आपले चेंबर सोडून त्याठिकाणी तातडीने आल्या. दरम्यान, पोलिसांनी सर्वांना बाहेर काढले. त्यानंतर मात्र, तहसील कार्यालयाच्या बाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Argument between Mahayuti, Uddhav Sena workers during application hearing for Kudal Malvan Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.