Vidhan Sabha Election 2024: दीपक केसरकरांसाठी ठरणार प्रतिष्ठेची लढाई, बंडखोरामुळे डोकेदुखी 

By अनंत खं.जाधव | Published: November 12, 2024 05:47 PM2024-11-12T17:47:08+5:302024-11-12T17:48:59+5:30

अनंत जाधव  सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Deepak Kesarkar will have a prestige battle In Sawantwadi Assembly Constituency | Vidhan Sabha Election 2024: दीपक केसरकरांसाठी ठरणार प्रतिष्ठेची लढाई, बंडखोरामुळे डोकेदुखी 

Vidhan Sabha Election 2024: दीपक केसरकरांसाठी ठरणार प्रतिष्ठेची लढाई, बंडखोरामुळे डोकेदुखी 

अनंत जाधव 

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत असली, तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या व  भाजप बंडखोर उमेदवारांमुळे येथे चौरंगी लढत होणार आहे. शिंदेसेनेचे दीपक केसरकर निवडणूक रिंगणात आहेत. तर त्याचे पारंपारिक विरोधक उद्धवसेनेचे राजन तेली उभे आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अर्चना घारे-परब यांनी बंडखोरी केल्यामुळे तेली यांची डोकेदुखी वाढली आहे. तर भाजपच्या विशाल परब यांची बंडखोरी केसरकर यांना डोकेदुखी ठरतना दिसत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा निसर्गाच्या विविधतेने नटलेला आहे या मतदारसंघात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहातात गोवा कर्नाटक ची सीमा या मतदार संघाला लागून आहे. तर वेगुर्लेला अथांग असा समुद्र किनारा तर सावंतवाडी दोडामार्गला सह्याद्री असे या मतदार संघाचे वर्णन करण्यात येते.

या मतदारसंघाचे गेले पंधरा वर्षे दीपक केसरकर हे प्रतिनिधित्व करतात मात्र मागील पंधरा वर्षात अनेकांनी दावेदारी केली पण त्यांना येथील मतदारांनी स्वीकारले नाही. केसरकर यांनीही तीन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात त्यातील दोन वेळा त्यांनी वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवली सध्या ते शिंदे सेनेकडून आपले नशीब आजमावत आहेत.

तर दुसरीकडे केसरकर यांचे पारंपारिक विरोधक राजन तेली यांनी दोन वेळा अपक्ष तर यावेळी उध्दव सेनेकडून उभे ठाकले आहेत.मात्र या महाविकास आघाडी विरूद्ध महायुतीच्या लढाईत अपक्ष उमेदवारांनी मात्र ट्विस्ट आणला आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या अधिकृत उमेदवारा विरोधात बंडखोरी झाल्याने दोन्ही पक्षांना आपले कार्यकर्ते व पदाधिकारी अपक्ष उमेदवाराकडे जाऊ नये म्हणून मोठी कसरत करावी लागणार आहे. सध्या भाजप ने केसरकर यांच्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. मात्र तेलींसाठी काँग्रेसची फौज कामाला येताना दिसत नाही.

मतदार संघातील समस्या

  • सावंतवाडी मतदार संघातील प्रमुख समस्या ही रोजगाराची असून अनेक युवक युवती या रोजगारासाठी गोव्याला जातात येथे मोठा उद्योग व्यवसाय नाही
  • सावंतवाडी मतदारसंघातील दुसरी समस्या ही आरोग्याची असून प्रत्येक रूग्णाला गोवा बाबुळीला जावे लागते.
     

सावंतवाडीतील मतदार संख्या 
एकूण मतदार: २ लाख ३० हजार 
 पुरूष : १ लाख १४ हजार ६४८
महिला : १ लाख १५ हजार ३५४

२०१९ च्या निवडणुकीत मिळालेली मते

  • दीपक केसरकर (शिवसेना) ..६९७८४
  • राजन तेली (अपक्ष)...५६५५६
  • बबन साळगावकर (राष्ट्रवादी काँग्रेस) ५३९६


अपक्ष उमेदवार 

  • विशाल परब (भाजप बंडखोर)
  • अर्चना घारे-परब (राष्ट्रवादी शरदचंद्र)

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Deepak Kesarkar will have a prestige battle In Sawantwadi Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.