Vidhan Sabha Election 2024: कुडाळमध्ये दोन शिवसेनेतील फाइट, कोणाला करणार टाइट ?

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 12, 2024 05:30 PM2024-11-12T17:30:34+5:302024-11-12T17:31:14+5:30

महेश सरनाईक सिंधुदुर्ग : मागील सलग दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून विजयी पताका फडकाविणारे उद्धवसेनेचे कुडाळमधील आमदार वैभव नाईक यांच्यासमोर यावेळी ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Former MP Nilesh Rane's challenge to MLA Vaibhav Naik in Kudal | Vidhan Sabha Election 2024: कुडाळमध्ये दोन शिवसेनेतील फाइट, कोणाला करणार टाइट ?

Vidhan Sabha Election 2024: कुडाळमध्ये दोन शिवसेनेतील फाइट, कोणाला करणार टाइट ?

महेश सरनाईक

सिंधुदुर्ग : मागील सलग दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून विजयी पताका फडकाविणारे उद्धवसेनेचे कुडाळमधील आमदार वैभव नाईक यांच्यासमोर यावेळी भाजपामधून शिंदेसेनेत प्रवेश करून धनुष्यबाण चिन्हावर लढणाऱ्या माजी खासदार नीलेश राणे यांची कडवी झुंज पहायला मिळत आहे. नाईक यांनी उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान म्हणून गेल्या पंधरा वर्षात या मतदारसंघात मोठा जनसंपर्क ठेवला आहे.

नारायण राणेंचा २०१४ साली पराभव करून वैभव नाईक जायंट किलर ठरले होते. मात्र, यावेळी पित्याच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी नीलेश राणेंनी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेऊन प्रत्येक गाव पिंजून काढत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या साथीने ‘अभी नही तो कभी नही’ म्हणत विजयाचा गुलाल उधळण्यासाठी जोरदार रणनिती आखली आहे. त्यामुळे नाईक वर्चस्व टिकवितात की राणे दहा वर्षांनंतर कमबॅक करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

  • पारंपरिक आणि अत्याधुनिक मासेमारी यांच्यातील वाद आणि परप्रांतीय एलईडी बोटींव्दारे मासळीची होणारी लूट हा मालवण किनारपट्टीवरील प्रमुख प्रश्न आहे.
  • मतदारसंघात कुडाळ येथे एमआयडीसी असून त्यात मोठे उद्योग नसल्याने रोजगाराचा मोठा प्रश्न या मतदारसंघातील युवक, युवतींनी भेडसावत आहे. त्यामुळे हा प्रमुख कळीचा मुद्दा म्हणून समोर आला आहे.
  • महायुतीच्या काळात राजकोट येथे उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यातच कोसळला. त्यामुळे त्याबाबत प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहे.
  • मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये आमदार नाईक यांच्याकडे धनुष्यबाण चिन्ह होते. आता मात्र, त्यांना मशाल चिन्हावर लढावे लागणार असून नीलेश राणे यांना धनुष्यबाण चिन्ह मिळालेले आहे.


२०१९ मध्ये काय घडले?
वैभव नाईक - शिवसेना (विजयी)

६९,१६८
रणजित देसाई अपक्ष
५४,८१९

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Former MP Nilesh Rane's challenge to MLA Vaibhav Naik in Kudal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.