कोकणात महायुतीचे आमदार निवडून येतील; उदय सामंतांनी व्यक्त केला विश्वास
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 23, 2024 06:52 PM2024-10-23T18:52:41+5:302024-10-23T18:54:49+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी खा. निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार
सिंधुदुर्ग : नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना अल्प कालावधी मिळाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट राणेंनी केला. कोकणची सेवा करण्याचे काम राणे कुटुंबियांनी केले आहे. आता कुडाळ मतदारसंघात परिवर्तन करताना थोडक्या मताने करु नका. विरोधकांचे पुन्हा अर्ज भरण्याचे धाडस होता कामा नये. कोकणातील सर्वच मतदारसंघात महायुतीचे आमदार निवडून येतील असा विश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
काँग्रेस आणि उबाठा सरकार आले तर लाडकी बहीण योजना बंद करायचे काम करणार आहेत. विरोधकांचे तिन्ही मतदारसंघात विरोधकांचे पराभव होईल. आपल्या जीवनाची सुरुवात कुणामुळे झाली, हे विसरून चालणार नाही. राणेंनी ज्या भावनेने ज्यांना ज्यांना मदत केली ते राणेंच्या विरोधात आहेत. तरीही राणे कमी नाहीत, राणे आणि सामंत हे थांबणारे नाहीत असेही सामंत म्हणाले. कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर माजी खा. निलेश राणे यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, अशोक दळवी, बँक अध्यक्ष मनीष दळवी, अशोक दळवी, वर्षा कुडाळकर, गोट्या सावंत, समीर नलावडे आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित आहेत.
मैदानावर तुफान गर्दी..
माजी खा.निलेश राणे पक्ष प्रवेश सोहळ्यात आयोजित मेळाव्यात पटांगणावर तुफान गर्दी झाली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.