निवडणूक यंत्रणा सतर्क; उमेदवारांच्या वाहनांची तपासणी, पोलिसांकडून नाकाबंदी
By अनंत खं.जाधव | Published: November 17, 2024 07:39 PM2024-11-17T19:39:58+5:302024-11-17T19:41:56+5:30
संशयास्पद वाहनावर लक्ष
सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून गाड्याची कसून तपासणी केली जात आहे. सावंतवाडीत उमेदवाराच्या गाड्या तपासल्या जात असून अपक्ष उमेदवार विशाल परब यांची गेल्या चार दिवसात तीन वेळा कार्यालय व गाडी तपासली गेली आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून सहा उमेदवार उभे आहेत यातील दोन उमेदवार पक्षीय आहेत तर इतर उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.आता शेवटचे दोन दिवस राहिले असून पोलिस ही चांगलेच सर्तक झाले असून निवडणूक आयोगाकडून तर प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत असून.यातून उमेदवार ही सुटले नाहीत.
अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या कार्यालय तसेच गाड्याची चार दिवसात दोन ते वेळा तपासणी करण्यात आली रविवारी दुपारी ही विशाल परब असलेल्या वाहनाला थांबवून ती पुन्हा तपासणी करण्यात आली.मात्र या वाहनात काहि सापडले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले तर इतर उमेदवाराच्या कार्यालया ची ही तपासणी करण्यात आली.तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संशयास्पद गाड्यावर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत असून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे.
राज्याबाहेरील पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. याबाबत विशाल परब यांना विचारले असता त्यांनी आपण प्रशासनास पूर्ण सहकार्य केले असून यापुढे ही सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले तसेच विरोधकांनी किती ही तक्रारी केल्या तरी आपण नेहमीच सहकार्य करत आलो असल्याचे परब यांनी सांगितले.