नीलेश राणे यांची ३२ कोटी ७५ लाख रुपये संपत्ती, १० फौजदारी खटले दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 05:07 PM2024-10-30T17:07:14+5:302024-10-30T17:07:54+5:30
कुडाळ : कुडाळ विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेकडून माजी खासदार नीलेश राणे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला अर्ज दाखल केला. त्यांनी ...
कुडाळ : कुडाळ विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेकडून माजी खासदार नीलेश राणे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जंगम व स्थावर अशी मिळून ३२ कोटी ७५ लाख रुपये संपत्ती नमूद केली आहे, तसेच जिल्ह्यासह परजिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात त्यांच्यावर १० फौजदारी खटले दाखल आहेत, अशी माहिती कुडाळ-मालवण विधानसभा निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नीलेश राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये जंगम मालमत्तेत नीलेश राणे यांच्या नावावर १५ कोटी ४ लाख ९६ हजार ७५७ रुपये, पत्नी प्रियांका राणे यांच्या नावावर ८ कोटी ६२ लाख ५६ हजार, मुलगा अभिराज राणे यांच्या नावावर २ कोटी ९ लाख ४९ हजार, हिंदू अविभक्त कुटुंबमध्ये ७३ लाख, तर स्थावर मालमत्तेत ६ कोटी ४१ लाख दाखविण्यात आले आहेत.
नीलेश राणे यांच्यावर ११ कोटी ९९ लाखांचे कर्ज आहे. पत्नी प्रियांका राणे यांच्या नावावर ४ कोटी १२ लाखांचे कर्ज असून हिंदू अविभक्त कुटुंबमध्ये १ लाख ४५ हजार रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.