सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक मतदान कुडाळमध्ये, कणकवलीत चार ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

By सुधीर राणे | Published: November 20, 2024 03:37 PM2024-11-20T15:37:31+5:302024-11-20T15:39:30+5:30

कणकवली : विधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या चुरशीने मतदान होत आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ६२ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात २ ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 the highest voter turnout was in Kankavali Assembly Constituency In Sindhudurg district | सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक मतदान कुडाळमध्ये, कणकवलीत चार ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक मतदान कुडाळमध्ये, कणकवलीत चार ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

कणकवली : विधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या चुरशीने मतदान होत आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ६२ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात २ लाख ८६ हजार ५६९ मतदारांनी मतदान केले आहे. 

सर्वाधिक मतदान कणकवली विधानसभा मतदारसंघात १ लाख ४ हजार ५३५ झाले आहे. तर कुडाळ विधानसभा मतदारसंघात ९१ हजार ७९०आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ९० हजार २४४ इतके मतदान झाले होते.

कणकवली विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदान सुरू आहे. चार ठिकाणी ईव्हीएम मशीनच्या समस्या उद्भवल्या. मात्र त्या त्या ठिकाणी तातडीने मशीन बदलून देण्यात आल्या असून कोणतीही समस्या न उद्भवता मतदान सुरू झाले. 

सकाळी ७ ते ९ मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे  

  • कणकवली -  ८.१५%
  • कुडाळ- ७ %
  • सावंतवाडी- ८.२ %


सकाळी ७ ते ११ मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे  

  • कणकवली - २१.३५%
  • कुडाळ- १५.२ %
  • सावंतवाडी- १८.५ %


दुपारी १ पर्यंत मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे  

  • कणकवली - ३८ %
  • कुडाळ- ३६ %
  • सावंतवाडी- ३९ %
     

दुपारी ३ वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी

  • कणकवली - ५१ %
  • कुडाळ- ५२ %
  • सावंतवाडी- ४८ %


सायंकाळी ५ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी

  • कणकवली - ६०%
  • कुडाळ - ६४ %
  • सावंतवाडी - ६२ %

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 the highest voter turnout was in Kankavali Assembly Constituency In Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.