Maharashtra Election 2019 : कणकवलीत नितेश राणे पुन्हा मिळवणार का विजय? 

By वैभव देसाई | Published: October 5, 2019 06:05 AM2019-10-05T06:05:16+5:302019-10-05T06:05:44+5:30

नितेश राणेंना भाजपाकडून एबी फॉर्म मिळाल्याने ते पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे निश्चित झाले.

Maharashtra Election 2019 : Nitesh Rane news | Maharashtra Election 2019 : कणकवलीत नितेश राणे पुन्हा मिळवणार का विजय? 

Maharashtra Election 2019 : कणकवलीत नितेश राणे पुन्हा मिळवणार का विजय? 

Next

- वैभव देसाई
कणकवली : नारायण राणे यांचा भाजप प्रवेश झाला नसला तरी राणेंचे पुत्र नितेश राणेंना भाजपने कणकवलीतून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तळकोकणातील राजकारणात वेगळीच रंगत आली आहे. भाजपच्या प्रमोद जठार यांनी माघार घेत आमदारकीसाठी नितेश राणेंचे नाव पुढे केल्याचे भाजप नेते अतुल काळसेकरांनी पत्रकार परिषदेत सांगितले. एकंदरीतच भाजपने टाकलेल्या या गुगलीने कणकवली मतदारसंघात इच्छुक असलेले संदेश पारकर आणि अतुल रावराणे यांचा हिरमोड झाला. नितेश राणेंना भाजपाकडून एबी फॉर्म मिळाल्याने ते पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे निश्चित झाले.

मात्र मतदारसंघातील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्याविरोधात एकवटल्याचे चित्र आहे. भाजप नेतृत्वाच्या निर्णयाविरोधात बंडाचा झेंडा फडकावत आम्ही कोणत्याही परिस्थितीत नितेश राणेंचे काम करणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. मात्र नारायण राणेंनी स्वत:चापक्ष भाजपामध्ये विलीन केल्यानंतर ती सर्व ताकद पक्षाला मिळेल, हा हिशेब वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. नारायण राणेंना पक्षात घेऊन भाजप त्यांचा शिवसेनेविरोधात अस्त्रासारखाच वापर करेल, अशी चर्चा आहे.

कोकणात भाजपाला शिवसेनेमुळे ताकद वाढवता आलेली नाही. कोकणात होऊ घातलेल्या प्रकल्पांसाठी भाजपाला तिथे आपले आमदार हवे आहेत, प्रत्येक वेळी शिवसेनेच्या दबावापुढे झुकणे भाजपाच्या फारसे पचनी पडत नाही. नितेश राणेंना भाजपाकडून मिळालेली उमेदवारी शिवसेना नेत्यांना आवडलेली नाही. राणेंचे एकेकाळचे जुने सहकारी असलेले सतीश सावंतही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. ती त्यांनी मिळवली. त्यामुळे राणे आणि त्यांचा समर्थक अशी ही लढत आहे. त्यात मतदार कोणाला कौल देतो, याकडे तळकोकणातील पुढील राजकारण ठरेल.

सिंधुदुर्गात तीन जागांसाठी ५१ अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन जागांसाठी एकुण ५१ अर्ज दाखल झाले आहेत. यात कणकवली मतदार संघात ८ उमेदवारांनी १५, कुडाळमध्ये १0 जणांनी १५ तर सावंतवाडीमध्ये १२ जणांनी २१ अर्ज दाखल केले आहेत. महायुतीमध्ये भाजपाच्या वाट्याला आलेल्या कणकवली मतदार संघात शिवसेनेने ए. बी. फॉर्म धरून अधिकृत उमेदवार दिल्याने महायुतीला तडा गेला आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून जर सतीश सावंत यांनी शिवसेनेकडून आपला अर्ज कायम ठेवला तर जिल्ह्यात युतीचे नियमोल्लंघन ठरेल.

Web Title: Maharashtra Election 2019 : Nitesh Rane news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.