Maharashtra Election 2019: ठाकरेंना निवडणुकीनंतर उत्तर देणार - नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 06:38 IST2019-10-18T05:07:29+5:302019-10-18T06:38:16+5:30
Maharashtra Election 2019: माझ्यावर कोणी कितीही टीका करू दे; मी त्यावर आता काही बोलणार नाही.

Maharashtra Election 2019: ठाकरेंना निवडणुकीनंतर उत्तर देणार - नारायण राणे
सावंतवाडी : माझ्यावर कोणी कितीही टीका करू दे; मी त्यावर आता काही बोलणार नाही. मात्र, २१ ऑक्टोबरनंतर प्रत्येकाचा नक्की समाचार घेईन, असा इशारा खा. नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला.
बुधवारी कणकवली येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी राणे कुटुंबीयांवर कठोर शब्दांत टीका केली होती. राणे ज्या पक्षात जातात, त्या पक्षाची वाट लागते. मित्राच्या घरात चोर घुसणार असेल तर मी त्यांना सावध करणार, अशा शेलक्या भाषेत त्यांनी राणेंवर प्रहार केला होता. त्याला राणे यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत उत्तर दिले. जे सिंधुदुर्गमध्ये येऊन बोलून जातात, ते जाऊदे पण जेव्हा मी टीका करणार तेव्हा तोंड लपवायला जागा शिल्लक रहाणार नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे, असा इशारा यावेळी राणे यांनी दिला आहे.