Maharashtra Election 2019 : कोकणात भाजपा हा नंबर एकचा पक्ष बनवू- नितेश राणे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 01:28 PM2019-10-03T13:28:44+5:302019-10-03T13:31:27+5:30

नारायण राणे यांचे सुपुत्र आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

Maharashtra Election 2019 - We will make BJP the number one party in Konkan - Nitesh Rane | Maharashtra Election 2019 : कोकणात भाजपा हा नंबर एकचा पक्ष बनवू- नितेश राणे 

Maharashtra Election 2019 : कोकणात भाजपा हा नंबर एकचा पक्ष बनवू- नितेश राणे 

Next

कणकवलीः नारायण राणे यांचे सुपुत्र आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. कणकवली इथल्या भाजपा कार्यालयात भाजपाचे नेते अतुल काळसेकर, प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत नितेश राणे कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल झाले असून, ते कणकवली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 

कार्यकर्त्यांना संबोधित करताना अतुल काळसेकर म्हणाले, भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक वेगळी परंपरा आहे. 2004साली अजित गोगटे आमदार झाले. 2009लाच त्यांनी सांगितलं की, मी एक टर्मच आमदार राहणार असून, माझ्यानंतर प्रमोद जठार आमदार होतील. या प्रवेशाच्या निमित्तानं मला पुन्हा एकदा अभिमान वाटतो. प्रमोद जठार यांनी स्वतःला मिळणारी आमदारकीची निवडणूक लढणार नसल्याचं सांगितले आहे. तसेच या मतदारसंघाचे आमदार नितेश राणे हे भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत. नितेश राणेंचे कार्यकर्ते आणि भाजपाचे कार्यकर्ते एकत्र निवडणुकीत सामोरे जातील, असंही काळसेकर म्हणाले आहेत.

नितेश राणे म्हणाले, देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि नारायण राणेंचे मी आभार व्यक्त करतो. सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष जठार, अतुल काळसेकर यांच्यासमोर सांगतो की, आजपासून या पक्षाला कोकणता नाही, तर महाराष्ट्रात ताकदवान बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोकणात भाजपा हा एक नंबरचा पक्ष राहील, यासाठी आम्ही प्रयत्न करू. आम्ही पक्षामध्ये नवीन असलो तरी आम्ही सगळ्यांचा मान राखू, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या शब्दांचं पालन केलं जाईल, भाजपाचे प्रत्येक आदेश पाळणार असून, पक्षाला मोठं करण्यासाठी लागणारं सगळं योगदान देऊ, असंही नितेश राणे म्हणाले आहेत. 

Web Title: Maharashtra Election 2019 - We will make BJP the number one party in Konkan - Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.