Maharashtra Election 2019 : नितेश राणेंचे भाजपामधील वय काय? संदेश पारकर यांचा जठारांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 08:56 AM2019-10-10T08:56:11+5:302019-10-10T13:28:13+5:30

नारायण राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. #MaharashtraElection2019

Maharashtra Election 2019 : What is Nitish Rane's age in BJP? Sandesh Parkar asked to Pramod Jathar | Maharashtra Election 2019 : नितेश राणेंचे भाजपामधील वय काय? संदेश पारकर यांचा जठारांना सवाल

Maharashtra Election 2019 : नितेश राणेंचे भाजपामधील वय काय? संदेश पारकर यांचा जठारांना सवाल

googlenewsNext

मुंबई : विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघामध्ये शिवसेना-भाजपाचे उमेदवार समोरासमोर उभे राहिले आहेत. माजी आमदार नितेश राणे यांना भाजपमध्ये घेत उमेदवारी दिल्याने भाजपामध्येच दोन गट पडले आहेत. एकीकडे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार राणेंसोबत तर युवा नेते संदेश पारकर सतीश सावंत यांच्या बाजुने उभे ठाकले आहेत. राज्यातील एकाच मतदारसंघात युती तुटल्याने आरोप प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे. 


नारायण राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. शिवसेनेच्या विरोधामुळे त्यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यास अडचणी येत होत्या. मात्र, भाजपाच्याच फॉर्मवर ते राज्यसभा सदस्य बनले. यानंतर लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, युतीमुळे ते सफल होऊ शकले नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी नितेश राणेंना भाजपात प्रवेश देत उमेदवारी दिली. याविरोधात भाजपाचे नेते संदेश पारकर यांनी बंडखोरी केली होती. मात्र, एकेकाळचे राणे यांचे कट्टर समर्थक असलेल्या आणि शिवसेनेत जात उमेदवारी मिळविलेल्या सतीश सावंतांना त्यांनी पाठिंबा देत उमेदवारी मागे घेतली. 

 

यावरून भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी संदेश पारकर यांना भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करा नाहीतर पक्षाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. तसेच संदेशचे वय किती असा सवालही केला होता. यावर संदेश पारकर यांनी जठार यांना प्रत्यूत्तर दिले. तुम्ही ज्या नितेश राणेंना अर्ज दिला त्यांचे भाजपातील वय काय असा प्रश्न विचारत जठारांना कणकवली नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळच्या घोषणेची आठवण करून दिली. 
नगरपरिषदेमध्ये पराभव झाल्यानंतर जठारांनी संदेश पारकर विधानसभेचा उमेदवार असेल, संदेशला निवडून आणेन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, जठार तुमचे शब्द विसरलात का, आता तुम्हाला राजकीय संन्यास घेण्याची गरज असल्याचा सल्लाही पारकर यांनी दिला. तसेच नितेश राणेंसाठी जीव देण्याची भाषा करत राणेंचे किती निष्ठावंत असल्याचे दाखवत असल्याचा आरोप केला. 


जठारांची 10 वर्षांतली भाषणे काढून पहा तफावत किती आहे...
गेली तीन वर्षे मी भाजपामध्ये काम करत आहे. जठार यांची गेल्या 7-8 वर्षांतली भाषणे काढून पहा किती तफावत आहे ती. आजच्या भाषणांमध्ये ती दिसेल, असेही पारकर यांनी म्हटले. 

Web Title: Maharashtra Election 2019 : What is Nitish Rane's age in BJP? Sandesh Parkar asked to Pramod Jathar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.