महाराष्ट्र निवडणूक निकालः सावंतवाडी, कुडाळमध्ये शिवसेना आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 10:05 AM2019-10-24T10:05:06+5:302019-10-24T10:07:10+5:30
कोकणातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन पैकी दोन मतदारसंघात शिवसेनेने आघाडी घेतली आहे.
Next
सिंधुदुर्ग - कोकणातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन पैकी दोन मतदारसंघात शिवसेनेने आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये सावंतवाडीमधून दीपक केसरकर आणि कुडाळमधून वैभव नाईक यांनी आघाडी घेतली आहे.
सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांच्यासमोर भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली यांनी आव्हान उभे केले होते. दरम्यान पहिल्या दोन फेऱ्यांमधील मतमोजणीनंतर दीपक केसरकर यांनी १८०७ मतांची आघाडी घेतली आहे.
कुडाळ मतदारसंघात तीन फेऱ्यांअखेर वैभव नाईक यांनी २ हजार ४०६ मतांची आघाडी घेतली आहे. आतापर्यंत वैभव नाईक यांना ९ हजार ३४७ तर रणजित देसाई यांना ६ हजार ९३१ मतांची आघाडी मिळाली आहे.