गोव्यासह महाराष्ट्राला कृषी क्षेत्रात मोठा वाव : विजय सरदेसाई, वेंगुर्लेत आंतरराष्ट्रीय आंबा परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 04:29 PM2018-05-12T16:29:54+5:302018-05-12T16:29:54+5:30

गोवा व महाराष्ट्र राज्याने एकत्रित येऊन कृषी क्षेत्रात विकास करावा. त्यासाठी गोव्याचे कायमच सहकार्य राहील, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा गोवा राज्याचे कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी येथे केले.

Maharashtra with great potential in agriculture: Vijay Sardesai, Vengurleet International Mango Council | गोव्यासह महाराष्ट्राला कृषी क्षेत्रात मोठा वाव : विजय सरदेसाई, वेंगुर्लेत आंतरराष्ट्रीय आंबा परिषद

आंबा परिषदेतील चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. व्हिक्टर गॅलन यांच्या हस्ते झाले. यावेळी गोव्याचे कृषिमंत्री विजय सरदेसाई, डॉ. तपस भट्टाचार्य, माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्र्रेकर, डॉ. शंकरराव मगर, डॉ. किसन लवांदे आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देगोव्यासह महाराष्ट्राला कृषी क्षेत्रात मोठा वाव : विजय सरदेसाईवेंगुर्लेत आंतरराष्ट्रीय आंबा परिषद

वेंगुर्ले : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे उत्तम दर्जाचे कृषी विद्यापीठ असून, येथे मिळविलेल्या ज्ञानाच्या जोरावर आज मी कृषिमंत्री झालो. गोव्याबरोबरच महाराष्ट्रालाही कृषी क्षेत्रात मोठा वाव आहे. गोवा व महाराष्ट्र राज्याने एकत्रित येऊन कृषी क्षेत्रात विकास करावा. त्यासाठी गोव्याचे कायमच सहकार्य राहील, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा गोवा राज्याचे कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी येथे केले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि इंटरडिसिप्लिनरी सोसायटी फॉर अ‍ॅडव्हॉन्मेंट आॅफ अ‍ॅग्रीकल्चरल सायन्सेस अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेला सुरुवात झाली.

या परिषदेत विदेशातील ४०, तर देशातील ३१२ शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्र्रेकर, डॉ. शंकरराव मगर, डॉ. किसन लवांदे, प्रमुख वक्ते डॉ. व्हिक्टर गॅलन, कृषी संशोधन स्पेनच्या प्रा. कॅनरी आयलँड, रिलायन्स ग्रुपचे माजी उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र्र गुंजाटे, डॉ. ए. के. सिंग, चार्ल्स डार्विंग युनिव्हर्सिटी आॅस्ट्रेलियाचे डॉ. पिंग लू, वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. प्रदीप हळदवणेकर आदी उपस्थित होते. यावेळी विजय सरदेसाई यांचा डॉ. व्हिक्टर गॅलन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

परिषदेच्या पहिल्या दिवशी जागतिक पातळीवर आंब्याची सद्यस्थिती, वातावरणातील बदल, आनुवंशिकता आणि प्रजोत्पादन, अभिवृद्धी आणि नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन या विषयांवर चर्चासत्र झाले. परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत.

 

Web Title: Maharashtra with great potential in agriculture: Vijay Sardesai, Vengurleet International Mango Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.