महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचा?्यांचे चौथ्या दिवशीही आंदोलन सुरुच
By admin | Published: March 9, 2017 06:18 PM2017-03-09T18:18:48+5:302017-03-09T18:18:48+5:30
सकारात्मक चर्चा
चौथ्या दिवशीही आंदोलन सुरुच
सकारात्मक चर्चा : जिवन प्राधिकरण कर्मचारी संघटना
सिंधुदुर्गनगरी: आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी संयुक्त संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेले धरणे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच आहे. तर आपल्या मागण्यांबाबत शासनस्तरावर सकारात्मक चर्चा सुरु आहे. आपल्या मगण्यांची फाईल पाणी पुरवठा मंत्रालयाकडून वित्त मंत्रालयाकडे गेली असे सांगतानाच मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याची माहिती समितीचे सहसचिव धीरज बेंडखळे यांनी आज दिली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कर्मचा?्यांचे वेतन, निवृत्ती वेतन, भत्ते याबाबतचे दायित्व शासनाने स्विकारावे या मागणीसाठी अनेक वेळा शासनस्तरावर चर्चा झाल्या आश्वासने मिळाली मात्र प्रत्यक्षात मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कर्मचा?्यांनी 1 मार्च ते 5 मार्च रोजी काळ्या फीती लावून काम करत शासनाचा निषेध नोंदविला होता त 5 मार्च पासून बेमुदत संपावर गेले आहेत.तसेच या कर्मचा?्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी संयुक्त संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 6 मार्च पासून या कर्मचा?्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे.
या आंदोलनाबाबत आंदोलनकर्त्यांना विचारणा केली असता आपल्या मागण्या मान्य करण्याबाबत शासनस्तरावर राज्य संघटना आणि शासन यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा सुरु आहे. पाणी पुरवठा मंत्रालयाकडून आपल्या मागण्यांची फाईल काल रात्री वित्त मंत्रालयाकडे सादर करण्यात आली आहे. आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा सुरु असल्याने आपले आंदोलन शांत व सनदशीर मागार्ने सुरु आहे मात्र आपल्या मागण्या येत्या काही दिवसात मान्य न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी संयुक्त संघर्ष समितीचे सहसचिव धीरज बेंडखळे यांनी दिली.
आंदोलन कर्त्यांकडे लोकप्रतिनिधींची पाठ!
आपल्या मागण्यांसाठी जीवन प्राधिकरण कर्मचा?्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरु असून या आंदोलन कर्त्यांना केवळ कुडाळचे नगराध्यक्ष विनायक राणे यांनीच भेट देत चर्चा केली आहे तर अन्य लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाकडे पाठ फिरविली आहे.