Maharashtra Election 2019: महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन करणार; नारायण राणेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 04:34 PM2019-10-10T16:34:28+5:302019-10-10T16:39:07+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 15 ऑक्टोबरला नितेश राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीत येणार

Maharashtra Swabhiman Party will merge with BJP in the presence of CM: Narayan Rane | Maharashtra Election 2019: महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन करणार; नारायण राणेंची घोषणा

Maharashtra Election 2019: महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन करणार; नारायण राणेंची घोषणा

googlenewsNext

सावंतवाडी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 15 ऑक्टोबरला नितेश राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीत येणार असून, त्यादिवशीच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडीत केली आहे. विलीनीकरणानंतर भाजप ज्या ठिकाणी मला सभेसाठी पाठवेल तिथे जाऊन मी सभा घेईन, असे राणे यांनी सांगितले. कणकवलीतील युती तुटण्याला सर्वस्वी शिवसेना जबाबदार असल्याचा आरोपही नारायण राणेंनी केला आहे.

एकेकाळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक उजवे हात  मानले जाणारे माजी आमदार राजन तेली यांनी पाच वर्षापूर्वी राणे पासून फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र पाच वर्षानंतर सिंधुदुर्गचे राजकारण  बदलले असून, राणे यांनीही काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सध्या राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. 

राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांमध्ये दीपक केसरकर यांनी विजय मिळवलेला आहे. 2009 मध्ये राष्ट्रवादीमधून तर 2014 मध्ये शिवसेनेमधून ते विधानसभेत पोहोचले होते. यावेळी दीपक केसरकर यांच्यासमोर राजन तेली आणि सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे आव्हान आहे. मात्र मुख्य लढत ही केसरकरविरुद्ध तेली अशीच होणार आहे. सावंतवाडी मतदारसंघात शिवसेना भक्कम स्थितीत आहेत. गेल्या निवडणुकीत केसरकर यांनी या मतदारसंघात भाजपा उमेदवार असलेल्या तेलींचा 40 हजारहून अधिक मतांनी पराभव केला होता. तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेला सुमारे 29 हजार मतांची आघाडी मिळाली होती. 
 

Web Title: Maharashtra Swabhiman Party will merge with BJP in the presence of CM: Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.