महाविकास आघाडी म्हणजे महाभकास सरकार : शेलार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 06:55 PM2021-01-13T18:55:01+5:302021-01-13T18:56:48+5:30

Ashish Shelar Bjp Sindhudurg- एक वर्ष झाले तुम्ही मुख्यमंत्री झालात त्याला. महाविकास नाही महाभकास आघाडी केली आणि कोकणाला काय दिले? चक्रीवादळ, अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांनी केलेली शेती अक्षरश: आडवी झाली. नुकसान भरपाईपोटी तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, असा आरोप भाजपचे नेते तथा माजी मंत्री आशिष शेलार यांनी केला.

Mahavikas Aghadi means Mahabhakas Sarkar: Shelar | महाविकास आघाडी म्हणजे महाभकास सरकार : शेलार

दांडेली गावभेट दौऱ्यात आमदार आशिष शेलार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राजन तेली, प्रमोद कामत, अतुल काळसेकर, संजू परब आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्दे महाविकास आघाडी म्हणजे महाभकास सरकार : शेलार शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने; दांडेली आरोसमध्ये गावभेट दौरा

सावंतवाडी : एक वर्ष झाले तुम्ही मुख्यमंत्री झालात त्याला. महाविकास नाही महाभकास आघाडी केली आणि कोकणाला काय दिले? चक्रीवादळ, अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांनी केलेली शेती अक्षरश: आडवी झाली. नुकसान भरपाईपोटी तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, असा आरोप भाजपचे नेते तथा माजी मंत्री आशिष शेलार यांनी केला.

दांडेली येथे गावभेट दौऱ्यात शेलार बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, बांदा मंडळ तालुकाध्यक्ष महेश धुरी, सावंतवाडी उपसभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, सावंतवाडी युवामोर्चा चिटणीस काका परब, दांडेली बुथ अध्यक्ष संदीप माणगावकर, मनसेचे अमित नाईक तसेच अमोल आरोसकर, सिद्धेश मालवणकर, देवेंद्र माणगावकर, राकेश दळवी, रसिक दळवी, दुर्गेश मोरजकर, कृष्णा पालयेकर, सुनील परब आदी ग्रामस्थ व उमेदवार उपस्थित होते.

शेलार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे निर्णय घेतले आहेत. आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान म्हणजे दोन हजार रुपये जमा होतात. तसेच ग्रामपंचायतला सुद्धा थेट निधी जमा होतो. यापुढेही ग्रामपंचायतीला कुठच्याही निधीची कमतरता भासल्यास आम्ही निधी देऊ, असे आश्वासनही शेलार यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले.

शिवसेनेच्या धमकीला भीक घालणार नाही : प्रमोद कामत

आम्ही पक्षाचे सेवक आहोत. दांडेलीतील आमच्या उमेदवारांचा फॉर्म भरताना शिवसेनेने उमेदवारांवर दबाव आणला होता. परंतु आम्ही कुणाच्याही धमकीला भीक घालत नसून प्रत्येक उमेदवारांच्या पाठीशी भाजप पक्ष ठामपणे उभा असल्याचे आव्हान, माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रमोद कामत यांनी विरोधकांना दिले
आहे. बांदा पॅटर्न दांडेली व आरोस गावात वापरून शिवसेनेची सत्ता असलेल्या या ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचा निर्धार प्रमोद कामत यांनी यावेळी बोलून दाखविला.

सेनेच्या ग्रामपंचायतींना सुरूंग : संजू परब

माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले होते की, संजू परब ग्रामीण भागातील आहे. त्याला सावंतवाडी शहरात मतदान करू नका. परंतु २५ वर्षांनंतर आपल्या नावाने सावंतवाडी नगरपालिकेत भाजपचा नगराध्यक्ष बसल्याचे, नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले. तालुक्यातील शिवसेनेच्या ग्रामपंचायतीला आता सुरूंग लावून भाजपचा झेंडा फडकविण्याचे काम युवकांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
 

 

Web Title: Mahavikas Aghadi means Mahabhakas Sarkar: Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.