महाविकास आघाडीला खाली खेचायचे आहे : नारायण राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 06:19 PM2020-11-03T18:19:34+5:302020-11-03T18:21:37+5:30
Shiv sena, mahavikasaghadi, politics, bjp, narayanrane, sindhudurgnews महाविकास आघाडीला खाली खेचायचे आहे. तसेच शिवसेनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हद्दपार करायचे आहे हाच आमचा योजनाबद्ध कार्यक्रम असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेचे आमदार किती? असा सवाल लोक विचारतील म्हणून मुख्यमंत्री पिंजर्यातून बाहेर पडत नाही असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
कुडाळ : महाविकास आघाडीला खाली खेचायचे आहे. तसेच शिवसेनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हद्दपार करायचे आहे हाच आमचा योजनाबद्ध कार्यक्रम असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेचे आमदार किती? असा सवाल लोक विचारतील म्हणून मुख्यमंत्री पिंजर्यातून बाहेर पडत नाही असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
केंद्र सरकार ज्या योजना राबवत आहेत त्या योजना राज्य सरकार राबवित नाही. राज्य सरकार काहीच काम करीत नाही याबाबतची माहिती तळागाळातीलवाजनतेपर्यंत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पोहचवावी असा ठराव आजच्या भाजपा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
कुडाळ येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणीची बैठक खासदार राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकी नंतर राणे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी माजीमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे, माजी खासदार निलेश राणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
राणे म्हणाले, कोकणात शिवसेनेचे 11 आमदार आहेत. मात्र येथील रस्ते, पाटबंधारे प्रकल्प, सी वर्ल्ड, विमानतळ तसेच इतर प्रकल्पाबाबत या सरकारने काहीच केले नाही. या जिल्ह्याचे पालकमंत्री हे पूर्णपणे निष्क्रिय आहेत. त्यामुळे आता जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपाच्या वतीने सरकार विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधी कोठून आणणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार अशी फक्त शिवसेनेने घोषणा केली. मात्र या वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन कुठे? तसेच निधी कुठून देणार? याची तरतूद केली नाही. या महाविद्यालयाची परवानगी ही केंद्र सरकार देते राज्य सरकार परवानगी देत नाही जिल्ह्याला विकास निधी देऊ न शकणारे हे सरकार सुमारे २५० कोटी रुपयांचा निधी हॉस्पिटलला कसा काय देणार? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.