‘अ‍ॅप’मुळे महावितरण गतिशील

By Admin | Published: February 14, 2017 09:49 PM2017-02-14T21:49:51+5:302017-02-14T21:49:51+5:30

दहा लाख ग्राहकांकडून वापर : कामकाजात सुधारणा

Mahavitaran Dynamic From 'App' | ‘अ‍ॅप’मुळे महावितरण गतिशील

‘अ‍ॅप’मुळे महावितरण गतिशील

googlenewsNext

सिंधुदुर्गनगरी : राज्यातील ग्राहकांना तत्पर व आॅनलाईन सेवा मिळावी यासाठी वीज ग्राहक व कर्मचाऱ्यांकरिता महावितरणच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅप्सला चांगला प्रतिसाद मिळत असून, केवळ सात महिन्यांत सुमारे दहा लाख ग्राहकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे.
या अ‍ॅपद्वारे आतापर्यंत १ कोटी ७० लाख ग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यात आले आहे. तसेच ७ लाख ४३ हजार ग्राहकांनी आपल्या वीज बिलांचा भरणा करण्यासाठी या अ‍ॅपचा वापर केला असून, सुमारे ४५ हजार ८१३ ग्राहकांना अ‍ॅपद्वारे नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे.
या अ‍ॅपद्वारे नवीन ग्राहकांना वीज जोडणी अर्ज, वीज बिलांची माहिती व बिलांचा भरणा वीज सेवांविषयी तक्रारी व अभिप्राय, आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
याशिवाय ज्या ग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यात आलेले नाही त्यांना अ‍ॅपद्वारे मीटर रीडिंग पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांची सोय झाली आहे. हे अ‍ॅप महावितरण वेबसाईट, गुगल प्ले, अ‍ॅपल, विंडोज स्टोअर्स येथे उपलब्ध आहे.
राज्यातील सुमारे ३८ हजारांपेक्षा अधिक तांत्रिक कर्मचाऱ्यांनी ‘कर्मचारी मित्र अ‍ॅप’ डाऊनलोड केले असून, याद्वारे नवीन वीज जोडणी, खंडित वीजपुरवठ्याबाबत एसएमएस, अचूक वीज मीटरचे रीडिंग, फिडर व डीटीसी मीटर रीडिंग, आदी कामे प्रभावीपणे केली जात आहेत. त्यामुळे महावितरणच्या कामकाजात गती आली आहे. (प्रतिनिधी)


एक कोटींवर : ग्राहकांची नोंद
महावितरणच्या सुमारे एक कोटी चार लाख ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली असून, या ग्राहकांना मीटर रीडिंग, वीज बिल, आॅनलाईन बिल, नवीन वीज जोडणीसाठी अर्ज व त्याची सद्य:स्थिती, मीटर वाचन घेतल्याचा आणि देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद करणे, आदींबाबतच्या सूचना महावितरणतर्फे एसएमएसद्वारे पाठविण्यात येत आहेत.

Web Title: Mahavitaran Dynamic From 'App'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.