महेश सरनाईक यांना शोधपत्रकारिता पुरस्कार, जिल्हा पत्रकार संघातर्फे घोषणा, विविध पुरस्कारांचे पत्रकार दिनी ६ जानेवारीला वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 05:21 PM2018-01-03T17:21:30+5:302018-01-03T17:26:41+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना प्रेरणा देणाऱ्या जिल्हा पत्रकार संघाच्या पुरस्कारांची घोषणा मंगळवारी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन नाईक यांनी केली.  लोकमतचे सिंधुदुर्ग आवृत्तीप्रमुख महेश सरनाईक यांना शोधपत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.

Mahesh Sarnaik, recipient of the research paper, announcement by District Journalist Association and various awardees on January 6. | महेश सरनाईक यांना शोधपत्रकारिता पुरस्कार, जिल्हा पत्रकार संघातर्फे घोषणा, विविध पुरस्कारांचे पत्रकार दिनी ६ जानेवारीला वितरण

महेश सरनाईक यांना शोधपत्रकारिता पुरस्कार, जिल्हा पत्रकार संघातर्फे घोषणा, विविध पुरस्कारांचे पत्रकार दिनी ६ जानेवारीला वितरण

Next
ठळक मुद्देअजित सावंत, देवयानी वरसकर, संतोष सावंत यांना पुरस्कार ६ जानेवारी रोजी सिंधुदुर्गनगरी येथे होणाऱ्या पत्रकार दिन सोहळ्यात वितरण पत्रकार भवनाचे भूमिपूजन लवकरच

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना प्रेरणा देणाऱ्या जिल्हा पत्रकार संघाच्या पुरस्कारांची घोषणा मंगळवारी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन नाईक यांनी केली.  लोकमतचे सिंधुदुर्ग आवृत्तीप्रमुख महेश सरनाईक यांना शोधपत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.



कणकवलीतील अजित सावंत यांना उत्कृष्ट पत्रकार, जिल्हा मुख्यालयातील देवयानी वरसकर यांना वरिष्ठ पत्रकार, सावंतवाडीतील संतोष सावंत यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ६ जानेवारी रोजी सिंधुदुर्गनगरी येथे होणाऱ्या पत्रकार दिनाच्या सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे .



जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा पत्रकार निवड समितीचे अध्यक्ष गजानन नाईक, पत्रकार संघाचे सचिव गणेश जेठे, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, मागील वर्षीचे पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार प्रमोद ठाकूर आदींच्या उपस्थितीत या निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली. यानंतर नाईक यांनी पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली. यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अशोक करंबेळकर, नंदकिशोर महाजन आदी उपस्थित होते.



जिल्हा पत्रकार संघाने आणखी दोन पत्रकारांना विशेष गौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. पत्रकारितेत महत्त्वाचे योगदान असलेले तुकाराम नाईक आणि पत्रकार संघाच्या सुरुवातीच्या काळापासून योगदान असलेले शिरोडा येथील मोहन जाधव यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

पत्रकार भवनाचे भूमिपूजन लवकरच

यावर्षी ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार होता. मात्र या कामाच्या निविदा प्रक्रिया आणि कार्यारंभ आदेशाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने भूमिपूजनाचा कार्यक्रम आता फेब्रुवारी महिन्यात केला जाईल, असेही यावेळी गजानन नाईक यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mahesh Sarnaik, recipient of the research paper, announcement by District Journalist Association and various awardees on January 6.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.