कराटे चॅम्पियनशिपमध्ये मैत्रेयी मलुष्टे

By admin | Published: January 29, 2016 09:59 PM2016-01-29T21:59:02+5:302016-01-30T00:16:36+5:30

रत्नागिरीचा झेंडा फडकला : संपूर्ण प्रशिक्षणानंतर प्रशिक्षक होण्याचे तिचे स्वप्न

Maitreyi Malushte in karate championship | कराटे चॅम्पियनशिपमध्ये मैत्रेयी मलुष्टे

कराटे चॅम्पियनशिपमध्ये मैत्रेयी मलुष्टे

Next

मेहरुन नाकाडे -- रत्नागिरी--हात व पायाचा वापर करुन स्वसंरक्षणात्मक कराटे हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावरही खेळण्यात येतो. रत्नकन्या मैत्रेयी विनय मलुष्टे हिने मुलुंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय डब्ल्यूडब्ल्यूएफ एस्को कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक पटकावून रत्नागिरीचा झेंडा उंचावला आहे.मैत्रेयी सध्या श्रीमान गंगाधरभाऊ गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यम प्रशालेत इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत आहे. मोठ्या बहिणीबरोबर अ‍ॅबॅकसच्या क्लासला जात असतानाच कराटेचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहून आपणही कराटे शिकावे, अशी इच्छा निर्माण झाली. पालकांनीही मैत्रेयीची इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले व इयत्ता पहिलीत असतानाच तिचे कराटे प्रशिक्षण सुरु केले. प्रशिक्षक जावेद मिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मैत्रेयी कराटेचे धडे घेत आहे. तिने आत्तापर्यंत व्हाईट, यलो, ग्रीन व ब्राऊन बेल्ट मिळवले आहेत. ब्राऊनमधील मोस्ट सिनीअर बेल्टसाठी मैत्रेयीचे प्रशिक्षण सध्या सुरु आहे. ब्लॅकबेल्ट मिळवून पुढील दहा डिग्रीज मिळवण्याची तिची मनिषा आहे.
सकाळी साडेसात ते दुपारी १२.४५पर्यंत शाळा केल्यानंतर सायंकाळी साडेपाच ते सात या वेळेत मैत्रेयीचा कराटे सराव सुरु असतो. भविष्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता मिळवण्याबरोबरच कृषी अथवा प्राणी क्षेत्रात करिअर करण्याचा तिचा मानस आहे. इतकेच नव्हे तर आपण कराटेचे संपूर्ण प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षक बनणार असल्याचेही तिने ‘लोकमत’शी बोलताना
सांगितले. मैत्रेयीने आत्तापर्यंत जिल्हास्तरीय राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशा विविध स्पर्धांमधून चार सुवर्ण, एक रौप्य व चार कांस्यपदकांची कमाई केली आहे.मैत्रेयीची आईदेखील कराटेपटू आहे. स्वसंरक्षणासाठी हा खेळ निश्चितच उपयोगी पडतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या खेळांची आवश्यकता आहे. परंतु, त्यासाठी प्रशिक्षण मात्र गरजेचे असल्याचे मैत्रेयीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.


जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकणाऱ्या रत्नकन्यांच्या यशाची मालिका



यश रत्नकन्यांचे


एप्रिलमध्ये महाबळेश्वर आणि मे महिन्यामध्ये दुबई येथील प्रशिक्षण शिबिरात ती सहभागी होणार आहे.

मैत्रेयीने मिळविलेले यश
जिल्हा मार्शल आर्ट कराटे स्पर्धेत दोन सुवर्णपदक.
राष्ट्रीय गोवा चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन सुवर्णपदक.
पनवेल येथे राष्ट्रीय आॅल इंडिया कराटे स्पर्धेत रौप्यपदक.
पनवेल येथील राष्ट्रीय चॅम्पियनशिप आॅल इंडिया कराटे स्पर्धेत तीनवेळा कांस्यपदक.
कोल्हापूर येथील राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कांस्यपदक.
मुलुंड येथे आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप कराटे स्पर्धेत कांस्यपदक.

Web Title: Maitreyi Malushte in karate championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.