विद्युत रोहित्रमध्ये मोठा घोटाळा, सिंधूरत्न योजनेची सखोल चौकशी करा; राजन तेलींची मागणी

By अनंत खं.जाधव | Published: October 5, 2024 12:53 PM2024-10-05T12:53:12+5:302024-10-05T12:53:54+5:30

सावंतवाडी : सिंधुरत्न योजना कोणाच्या घरची नाही सर्व सामान्य जनतेची आहे. पण या योजनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाला ...

Major Scam in Vidyut Rohitra, Probe Deeply Probe Sindhuratna Yojana; Demand for Rajan teli | विद्युत रोहित्रमध्ये मोठा घोटाळा, सिंधूरत्न योजनेची सखोल चौकशी करा; राजन तेलींची मागणी

विद्युत रोहित्रमध्ये मोठा घोटाळा, सिंधूरत्न योजनेची सखोल चौकशी करा; राजन तेलींची मागणी

सावंतवाडी : सिंधुरत्न योजना कोणाच्या घरची नाही सर्व सामान्य जनतेची आहे. पण या योजनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाला आहे. मतदारांना योजना द्यायचे सोडून कासार्डे मायनिंग सारख्या अनेक प्रकल्पांना विद्युत रोहित्र देण्यात आले आहेत. त्यामुळे या अपहाराची चौकशी होणे गरजेची असल्याची मागणी माजी आमदार राजन तेली यांनी केली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. याबाबतचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. लवकरच याचा पर्दाफाश करणार असल्याचेही ते म्हणाले.

तेली म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीमधून शिवसेनेचे विद्यमान आमदार दीपक केसरकर यांना उमेदवारी देऊ नये. त्यांच्याऐवजी पक्षातील कुणाही व्यक्तीला उमेदवारी द्या. केसरकर यांना सोडून अन्य कुणालाही उमेदवारी दिली तर आपण निवडणूक लढणार नाही, असेही राजन तेली यांनी स्पष्ट केले.

दीपक केसरकरांना उमेदवारी देऊ नका

मी निवडणुकीसाठी इच्छुक आहे. कारण दीपक केसरकर यांनी या मतदारसंघात सर्वसामान्य गोरगरीब जनतेची फसवणूक केली आहे. खोटे बोलणे आणि रेटून बोलणे ही त्यांची सवय आहे. पैसा देणे आणि खोटे बोलणे यावरच ते आतापर्यंत निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नका. दिल्यास मी त्यांचे काम करणार नाही, असेही तेली यांनी स्पष्ट केले आहे. येत्या आठ दिवसात सर्व काही ठरणार आहे. पक्षाने माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांचा विचार केला तर मी थांबेन. नाहीतर कार्यकर्त्यांचा विचार घेऊन माझा मी निर्णय घेणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. 

केसरकर निवडणूक आली की, खोटं बोलतात

सिंधूरत्न योजना आपल्याच मालकीची असल्यासारखे केसरकर वागवत आहेत. त्यांनी विद्युत रोहित्र वितरणात मर्जीतल्या ठेकेदाराला निविदा देण्यात आली. २९ लाख रुपये कासार्डे मायनिंग प्रकल्पासाठी कसे काय देण्यात आले? त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आपण केली आहे. केसरकर निवडणूक आली की, खोटं बोलतात. पैशाच्या जीवावर ते निवडणुकीला सामोरे जातात. मी वारंवार सांगत आलो आहे की ते नेहमी खोटे बोलतात. त्यामुळे आता जनतेने सावध व्हावे, असेही आवाहन तेली यांनी केले.

Web Title: Major Scam in Vidyut Rohitra, Probe Deeply Probe Sindhuratna Yojana; Demand for Rajan teli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.